23 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरविशेषस्टील उत्पादन, हजारो रोजगार आणि कोटी वृक्षांची लागवड-गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा!

स्टील उत्पादन, हजारो रोजगार आणि कोटी वृक्षांची लागवड-गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा!

Google News Follow

Related

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली येथे ‘लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’च्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत गडचिरोलीच्या औद्योगिक, पर्यावरणीय आणि सामाजिक प्रगतीच्या वाटचालीची सविस्तर माहिती दिली.

ग्रीन स्टील क्लस्टरच्या माध्यमातून चीनपेक्षा दर्जेदार आणि कमी किमतीचे स्टील तयार करण्याचे उद्दिष्ट असून २०,००० नव्या रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. लॉयड्स कंपनीमध्ये आज १४,००० स्थानिक युवक-युवती कार्यरत असून, काही महिलांनी हाऊसकीपिंगपासून सुरुवात करून वॉल्वो ट्रक ड्रायव्हर म्हणून ₹५५,०००  प्रती महिना पगार मिळवला आहे.

राज्यातील पहिली व देशातील चौथी ८० किमी स्लरी पाइपलाइन, ई-व्हेईकल्स आधारित वाहतूक आणि ग्रीन ट्रान्सपोर्टसह पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

हे ही वाचा : 

काजोल आणि ट्विंकल खन्ना जोडी करणार धमाल

काळा वेलदोडा : चव, सुगंध आणि आरोग्याची साथीदार

गोव्यात पर्यटकांच्या संख्येत वाढ

बाली आणि रावण यांच्यातील एक विस्मयकारक भेट

गडचिरोली जिल्ह्यात २ वर्षांत १ कोटी वृक्षारोपणाचे लक्ष्य असून, त्यातील ४० लाख वृक्षांची लागवड आजपासून सुरू झाली. लॉयड्समार्फत स्थानिकांसाठी शाळा, रुग्णालय, कामगारांना भागधारक बनवण्याचा निर्णय, तसेच गोंडवाना व कर्टिन विद्यापीठांतर्गत मायनिंग अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, गडचिरोली हा जिल्हा पुढील ५ वर्षांत दरडोई उत्पन्नामध्ये राज्यातील पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये असेल, हा विश्वास आहे. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार परिणय फुके, आमदार धर्मरावबाबा आत्राम, पद्मश्री श्रीमती तुलसी मुंडा व इतर मान्यवर उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा