26 C
Mumbai
Wednesday, December 24, 2025
घरविशेषस्प्राईटच्या बाटलीचा हिरवा रंग १ ऑगस्टपासून जाणार

स्प्राईटच्या बाटलीचा हिरवा रंग १ ऑगस्टपासून जाणार

Google News Follow

Related

येत्या १ ऑगस्टपासून स्प्राईटची हिरव्या रंगाची शीतपेयाची बाटली बंद होणार असून त्या ऐवजी पांढऱ्या किंवा पारदर्शक बाटलीमध्ये विकण्याचा निर्णंय कोका कोला या निर्मात्या कंपनीने घेतला आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने अधिक जबाबदार होण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

या संदर्भात कोका कोलाने २७ जुलै रोजी एका निवेदनाद्वारे घोषणा केली होती. फक्त स्प्राईटच नाही तर हिरव्या रंगाच्या बाटलीत उपलब्ध असलेल्या फ्रस्का, सीग्रम आणि मेलो यलो ही इतर शीतपेय देखील पारदर्शक बाटल्यांमध्ये मिळणार आहे. याची अंमलबजावणी अमेरिकेपासून होणार असून त्यानंतर भारतासह जगभरात या हिरव्या बाटल्यांची जागा स्वच्छ, पारदर्शक बाटल्या घेतील असे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान कोका-कोलाने २०१९ मध्येच युरोपियन देशांमध्ये आणि काही दक्षिण आशियाई देशांमध्ये स्प्राईटच्या हिरव्या बाटल्यांच्या जागी पारदर्शक बाटल्या वापरण्यास सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये फिलिपिन्समध्ये याची सुरुवात झाली.

६१ वर्षांची हिरव्या रंगाची ओळख

जगातील अत्यंत लोकप्रिय शीतपेयांपैकी एक असलेले स्प्राईट १९६१ मध्ये पहिल्यांदा अमेरिकेच्या बाजारात आणण्यात आले. आकर्षक सिग्नेचर ग्रीन पॅकिंगमुळे स्प्राईट घराघरात लोकप्रिय झाले. आता या ६१ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर स्प्राईटच्या बाटलीचा रंगबदल होत आहे. स्प्राईट हे जगातील तिसरे सर्वात मोठे आणि कोका-कोलाचे सर्वात जास्त विकले जाणारे शीतपेय कोक नंतरचे दुसरे पेय आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सत्तेची मलई ओरपलीत तेव्हा कुठे होता मराठी बाणा?

राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही

संजय राऊतांची शिवीगाळ करत असतानाची ऑडियो क्लिप व्हायरल

धनुष्यातील ‘बाणा’सोबत ‘अर्जुन’ही शिंदेंसोबत

पारदर्शक प्लास्टीक पुनर्वापरासाठी चांगले

रिसायकलिंगसाठी स्पष्ट प्लास्टिक अधिक चांगले असल्याचे कंपनीने म्हटलं आहे. हिरवे प्लास्टिक सामान्यत: पुनर्वापर करण्यायोग्य असते, परंतु ते नेहमीच रीसायकल करणे सोपे नसते.प्लॅस्टिकमध्ये असलेल्या रंगासारख्या कोणत्याही पदार्थाचा पुनर्वापर करणे कठीण होऊ शकतं. या कारणास्तव, खूप कमी कंपन्या रंगीत प्लास्टिकचा पुनर्वापर करतात. हिरवे प्लास्टिक पर्यावरणासाठी हिरवे नाही. रंगीत बाटली पुनर्वापरासाठी दूषित पदार्थासारखी असते आणि ती वेगळी करावी लागते, ज्यामुळे ती कचऱ्यात म्हणजेच प्लास्टिक कचरा किंवा इतर कचऱ्यात जाण्याची शक्यता वाढते. हिरव्या प्लॅस्टिकसाठी फार मोठी बाजारपेठ नाही असेही कंपनीनं म्हटलं आहे.

पॅकिजंगमध्य ग्रीन पॉलिथीन टेरेप्थालेट घटक

स्प्राईटच्या सध्याच्या पॅकेजिंगमध्ये ग्रीन पॉलिथिन टेरेफ्थालेट (पीईटी) आहे. हिरव्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर करता येत असला तरी नवीन बाटल्या बनवण्यासाठी त्याचा पुनर्वापर करता येत नाही. स्प्राईटमधील हिरव्या प्लास्टिकचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. परंतु त्याचा पुनर्वापर करून, फक्त एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तू जसे की कार्पेट किंवा कपडे बनवता येतात. मात्र, बाटल्यांच्या निर्मितीसाठी त्याचा पुनर्वापर करता येत नाही असं कोका कोलाने म्हटलं आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सत्तेची मलई ओरपलीत तेव्हा कुठे होता मराठी बाणा?

राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही

संजय राऊतांची शिवीगाळ करत असतानाची ऑडियो क्लिप व्हायरल

धनुष्यातील ‘बाणा’सोबत ‘अर्जुन’ही शिंदेंसोबत

२०३० पर्यंत प्रत्येक बाटलीचा पुनर्वापर

कोका-कोलाने २०१८ मध्ये आपला “वर्ल्ड विदाऊट वेस्ट” उपक्रम सुरू केला. याद्वारे, कंपनीने २०३० पर्यंत प्रत्येक बाटली किंवा केनचा पुनर्वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या कालावधीत कोका-कोला बनवणाऱ्या बाटल्यांपैकी ५० % बाटल्या पुनर्वापर केलेल्या साहित्यापासून बनवल्या जातील. यामुळे २०१९ च्या तुलनेत २० दशलक्ष पौंड किंवा सुमारे ९ दशलक्ष किलो प्लास्टिकचे उत्पादन टाळता येईल. यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन २५ हजार मेट्रिक टनांनी कमी होईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा