“राष्ट्र सर्वोपरी”चे धडे काँग्रेसने पंतप्रधान मोदींना द्यावेत, हा या शतकातील सगळ्यात मोठा विनोद!

भाजपा आमदार अतुल भातखळकरांची टीका 

“राष्ट्र सर्वोपरी”चे धडे काँग्रेसने पंतप्रधान मोदींना द्यावेत, हा या शतकातील सगळ्यात मोठा विनोद!

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देत असताना अमेरिकेच्या इशाऱ्यावर ऑपरेशन सिंदूर थांबवल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. यासह काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भारताने पाकिस्तानला झोडपले मात्र त्याचे वळ काँग्रेसच्या पाठीवर उमटले आहेत. “राष्ट्र सर्वोपरी”चे धडे काँग्रेसने पंतप्रधान मोदींना द्यावेत, हा या शतकातील सगळ्यात मोठा विनोद आहे, असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.

भोपाळमधील एका सभेमध्ये भारत पाकिस्तानमधील युद्धविरामावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले, ट्रम्प यांनी फोन केला आणि नरेंद्र मोदींनी लगेच शरणागती पत्करली. इतिहास साक्षी आहे, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे चरित्र आहे, ते नेहमीच झुकतात. पण अमेरिकेच्या धमकीला न जुमानता भारताने १९७१ मध्ये पाकिस्तान तोडला होता.
काँग्रेसचे बब्बर शेर आणि सिंहीणी महासत्तांशी लढतात, कधीही झुकत नाहीत.

यावेळी त्यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांची नावे घेत ते शरणागती पत्करणार नसल्याचे म्हटले. ते म्हणाले, काँग्रेस शरणागती पत्करत नाही. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांचे उदाहरण देत राहुल म्हणाले की, हे लोक शरणागती पत्करणारे नाहीत.

हे ही वाचा  : 

माइंडफुलनेस : आनंदी राहण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग, जाणून घ्या फायदे

अर्द्धहलासनासनाचे आरोग्यदायी फायदे : तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी!

‘सिंधूच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबावर पाकचा हक्क’

IPL 2025 मधील पुरस्कार विजेत्यांची यादी

दरम्यान, राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर भाजपाच्या नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आमदार अतुल भातखळकर यांनी देखील राहुल गांधींसह पक्षावर टीका केली. एक्सवर ट्वीटकरत ते म्हणाले, भारताने “ऑपरेशन सिंदूर”मध्ये पाकिस्तानला बेदम झोडपले आहे. मात्र त्या माराचे वळ काँग्रेसच्या पाठीवर उमटले आहेत. त्यामुळे आज पाकिस्तान आणि काँग्रेस दोघेही विव्हळत आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी गोपनीय करार करणाऱ्या काँग्रेसने आंतरराष्ट्रीय कूटनीतीवर न बोललेलेच बरे. “राष्ट्र सर्वोपरी” चे धडे काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना द्यावेत, हा या शतकातील सगळ्यात मोठा विनोद आहे, असे आमदार भातखळकर म्हणाले.

Exit mobile version