महाराष्ट्र राज्य हे भारताची कोरोना कॅपीटल बनले आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. ही परिस्थिती बघुनच महाराष्ट्र सरकारने राज्यात लाॅकडाऊन लागू केला आहे. पण त्याचा फायदा होताना दिसत नाहीये कारण रूग्णसंख्येत घट दिसून येत नाहीये.
बुधवार, २८ एप्रिल रोजी महाराष्ट्रात ६३,३०९ कोरोना रूग्ण आढळले आहेत तर ६११८१ जण हे कोरोनाच्या विळख्यातून बरे झाले आहेत. या आकडेवारीनंतर राज्यातील एकूण सक्रिय रूग्णांची संख्या ही ६,७३,४८१ इतकी आहे. पण बुधवारी राज्यातील ९८५ रुग्णांनी या कोरोना विरुद्धच्या लढाईत आपले प्राण गमावले आहेत.
हे ही वाचा:
रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत भीषण आग; जीवितहानी नाही
मोफत लशीची फक्त घोषणा, मग १ मेपासून लस का नाही?
लसीकरण केंद्रातील रांगांवर जालीम डोस कोणता?
मोफत लसीची घोषणा म्हणजे ठाकरे सरकारचे लबाडा घरचे आवताण…
दरम्यान बुधवारी दुपारी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी हा १५ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तर १ मे पासून राज्यात सुरु होणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाच्या बाबतीतही महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्वांचे लसीकरण हे सरसकट मोफत होणार असल्याची घोषणा राज्याकडून करण्यात आली आहे. पण हे लसीकरण फक्त शासकीय केंद्रांवरच मोफत होणार आहे. खासगी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतल्यास त्याचे शुल्क भरावे लागणार आहे.







