26 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरविशेषक्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचे वडील करत होते धर्मांतरण; खार जिमखान्याचे सदस्यत्व रद्द

क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचे वडील करत होते धर्मांतरण; खार जिमखान्याचे सदस्यत्व रद्द

जेमिमाच्या वडिलांवर सदस्यत्वचा गैरवापर केल्याचा आरोप

Google News Follow

Related

भारताची स्टार महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबईतील सर्वात जुन्या क्लबपैकी एक असलेल्या खार जिमखाना क्लबने जेमिमा हिचे सदस्यत्व तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जेमिमाच्या वडिलांनी तिला मिळालेल्या सदस्यत्वचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मुंबईतल्या जुन्या क्लब्सपैकी एक असलेल्या खार जिमखान्याने महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. खार जिमखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेमिमाचे वडील इव्हान हे जिमखान्याच्या परिसरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत होते. ते समाजातील उपेक्षितांचं धर्मांतरही करुन घेत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

जेमिमाचे वडील इव्हान यांच्यासह काही सदस्यांनी क्लबच्या जागेचा धार्मिक कार्यासाठी वापर केल्याने खार जिमखाना अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. जेमिमाच्या वडिलांनी क्लबच्या अध्यक्षीय सभागृहामध्ये दीड वर्षाच्या कालावधीत ३५ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले. “जेमिमाचे वडील इव्हान हे ‘ब्रदर मॅन्युअल मिनिस्ट्रीज’ या संघटनेशी संलग्न असून त्यांनी जिमखान्यातील प्रेसिडेन्शियल हॉल जवळपास दीड वर्षांसाठी वापरला. त्यांनी या कालावधीत तिथे ३५ हून अधिक कार्यक्रम आयोजित केल्याचं आमच्या लक्षात आलं. त्या कार्यक्रमात काय चालायचं हे आम्हाला ठाऊक आहे. देशभरात अनेक ठिकाणी धर्मांतराचे प्रकार सुरू असल्याच्या बातम्या आपण वाचतो. पण हे सगळं जिमखान्यात घडत होतं. त्या कार्यक्रमात नृत्य चालायचं. अतिशय महाग अशी संगीत यंत्रणा आणली जायची. मोठे स्क्रीन बसवले जायचे. खार जिमखान्याच्या घटनेतील ४ अ कलमानुसार क्लबमध्ये कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकत नाही,” असं खार जिमखाना कार्यकारिणी सदस्य शिव मल्होत्रा यांनी सांगितले.

हे ही वाचा :

पंजाब दहशतवादी कट प्रकरण: दोन खलिस्तानी दहशतवाद्यांच्या प्रमुख साथीदारावर आरोपपत्र दाखल

…म्हणे मंदिरातील लाऊडस्पीकरमुळे ध्वनिप्रदूषण वाढते!

बैरुतमध्ये रुग्णालयाखाली असलेल्या नसरल्लाच्या बंकरमध्ये कोट्यवधीची माया

कामगारांच्या हत्येप्रकरणी जम्मू काश्मिरात ‘लष्कर’ची शाखा छाटण्याची कारवाई सुरू!

रविवारी खार जिमखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सदस्यत्वाचा गैरवापर हा विषय पटावर ठेवण्यात आला. त्यानंतर जेमिमाचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. खार जिमखान्याचे अध्यक्ष विवेक देवनानी यांनी माहिती दिली की, “जेमिमा हिला तीन वर्षांचे मानद सदस्यत्व क्लबने दिले होते. २० ऑक्टोबरला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे सदस्यत्व रद्द करावं यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला.” गेल्या वर्षी खार जिमखान्याने जेमिमाला मानद सदस्यत्व दिलं जेणेकरून क्लबच्या प्रांगणात ती येऊन सराव करू शकते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा