24 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरविशेषक्रिकेटपटू मयांक अगरवाल विमानात असे काय प्यायला की, त्याला उलट्या सुरू झाल्या!

क्रिकेटपटू मयांक अगरवाल विमानात असे काय प्यायला की, त्याला उलट्या सुरू झाल्या!

कुणीतरी कट केल्याची पोलिसात तक्रार

Google News Follow

Related

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज मयांक अगरवाल ओदिशातून बेंगळुरूला जात असताना विमानात आजारी पडल्यामुळे रुग्णालयात भरती आहे. पण आपल्याविरोधात कुणीतरी कटकारस्थान केल्याचा त्याचा आरोप असून विमानातील खुर्चीवर ठेवलेला द्रवपदार्थ आपण प्यायल्याने त्रास झाल्याची तक्रार त्याने पोलिसांत केली आहे.

मयांकला आजारी पडल्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे ओठ सुजले होते आणि त्याच्या तोंडातही जळजळ होत होती. हा द्रवपदार्थ प्यायल्यानंतर त्याला लागलीच त्रास होऊ लागला आणि तो आजारी पडला.

हे ही वाचा:

हर्ष गायकरच्या खेळाने दिलीप वेंगसरकर प्रभावित!

‘पंतप्रधान मोदी यांची माफी मागा’

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बंडखोरांनी १५ नागरिकांना मारले!

“लोकशाही मूल्यांचे वस्त्रहरण करणाऱ्या खासदारांनी शेवटच्या सत्रात आत्मपरिक्षण करावं”

मयांकच्या मॅनेजरने ही तक्रार पोलिसात केली असून पश्चिम त्रिपुराचे पोलिस अधिकारी याबाबत तपास करत आहेत. सदर अधिकारी किरण कुमार म्हणाले की, न्यू कॅपिटल कॉम्प्लेक्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मॅनेजरने म्हटले आहे की, मयांक जेव्हा इंडिगोच्या विमानात चढला तेव्हा त्याच्या खुर्चीवर एक पाऊच ठेवलेला होता. त्यातील द्रवपदार्थ मयांक प्यायला. पण हा द्रवपदार्थ थोडासा प्यायल्यावरच त्याला कसेसे होऊ लागले. तोंडात जळजळ झाली आणि त्याला बोलणेही कठीण झाले. त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला आयएलएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या तोंडाला सूज आली होती तसेच काही व्रणही दिसत होते.

मयांक सध्या आगरतळा येथे उपचार घेत आहे. तिथे त्याला चांगले उपचार दिले जातील असे आश्वासन डॉक्टरांनी दिले आहे. डॉक्टरांचे एक पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. या आजारपणामुळे तो पुढील कर्नाटकच्या संघाकडून दोन रणजी सामने खेळू शकणार नाही. त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात तो खेळला होता. तिथे ५१ आणि १७ धावांची खेळी त्याने केली. तिथून विमानाने निघत असताना त्याच्याबाबतीत हा प्रसंग घडला.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा