मध्यप्रदेश सरकारमधील मंत्री कुंवर विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरैशी यांच्याविरोधात दिलेल्या वादग्रस्त विधानावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने मंत्री विजय शाह यांना फटकारले आणि स्पष्ट शब्दांत म्हटले, “आपण आमच्या संयमाची परीक्षा घेत आहात. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, मंत्री शाह यांच्या हेतूंवर न्यायालयाला शंका आहे. कोर्टाने प्रश्न विचारला की, “विजय शाह यांनी अजूनपर्यंत आपल्याच्या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरीत्या माफी मागितली आहे का?” तसेच कोर्टाने एसआयटी (विशेष तपास पथक) ला विचारले की, शाह यांच्या वक्तव्यामुळे ज्या लोकांच्या भावना दुखावल्या, त्यांच्या जबाबांबाबत काय कारवाई झाली आहे?
एसआयटीने कोर्टाला कळवले की, आत्तापर्यंत २७ लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत आणि वादग्रस्त व्हायरल व्हिडिओ क्लिपचीही तपासणी करण्यात आली आहे. सध्या सर्व रेकॉर्डचे विश्लेषण सुरू असून १३ ऑगस्टपर्यंत तपास अहवाल अंतिम केला जाईल, असेही एसआयटीने नमूद केले. या उत्तरानंतर सुप्रीम कोर्टाने प्रकरणाची पुढील सुनावणी स्थगित केली आहे. आता १८ ऑगस्ट रोजी या प्रकरणावर पुढील सुनावणी होईल. कोर्टाने निर्देश दिले की, एसआयटीचा एक सदस्य तपासाच्या स्थिती अहवालासह १८ ऑगस्ट रोजी वैयक्तिकरित्या न्यायालयात उपस्थित राहील.
हेही वाचा..
गाझा पट्टीमधील भूकबळीबद्दल ट्रम्प यांची खंत
छत्तीसगढमध्ये ‘जबरदस्तीने धर्मांतर’-‘मानवी तस्करी’चा आरोप, दोन ननसह तिघांना अटक!
अवसानेश्वर मंदिर दुर्घटना : मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत
चीनमध्ये भूस्खलनात चार जणांचा मृत्यू, आठ जण बेपत्ता
संदर्भासाठी सांगायचे झाल्यास, इंदूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मंत्री विजय शाह यांनी कुरैशी यांचे नाव न घेता वादग्रस्त विधान केले होते. कर्नल सोफिया कुरैशी यांच्याकडे सूचक इशारा करत शाह म्हणाले होते, “ज्यांनी आमच्या मुलींना विधवा बनवले, त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही त्यांच्या बहिणीला पाठवले. मात्र, वाद वाढल्यावर मंत्री कुंवर विजय शाह यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर एक मिनिट १३ सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट करून कर्नल सोफिया कुरैशी यांच्याविरोधातील आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.







