मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तान मिर्झा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोझर धोरणाचे कौतुक केले आहे. तसेच राजकारणात किंवा ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावले आहे.
आयएएनएसशी बोलताना हसीन मस्तान मिर्झा म्हणाल्या की, त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोझर कारवाईला पाठिंबा देतात. त्या म्हणाल्या, “मी याबाबत ‘एक्स’वर पोस्टही केली होती. मला वाटते त्यांनी मुंबईत यावे आणि ज्या बंगल्यांमध्ये गुन्हेगार बसले आहेत, त्यांच्यावर बुलडोझर चालवावा. माझ्या माजी पतीने माझ्यावर बलात्कार केला. योगी सरकारमध्ये अशा लोकांचा एनकाऊंटर केला जातो. त्यांच्या राजवटीत पीडितांना न्याय मिळतो.”
राजकारणात येण्याच्या चर्चांना नाकारताना त्या म्हणाल्या की त्यांची अशी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. हसीन मस्तान म्हणाल्या, “मी राजकारणातील अनेक लोकांना ओळखते, पण मला राजकारणात यायचे नाही. मला राजकारण समजत नाही. सध्या ज्या सत्तेत आहेत, जसे की भाजप, त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे, एवढीच माझी इच्छा आहे.”
हसीन मस्तान यांनी हेही सांगितले की त्यांना रिऍलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आले होते, मात्र मानसिक आरोग्याच्या कारणांमुळे त्यांनी हा प्रस्ताव नाकारला. त्यांची ही मागणी गेल्या आठवड्यात इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओनंतर समोर आली आहे. त्या व्हिडिओत त्यांनी न्यायासाठी चाललेल्या आपल्या दीर्घ लढ्याबद्दल सांगितले होते आणि पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.
हे ही वाचा:
पाकिस्तानसाठी हेरगिरी : दोन काश्मिरींना अटक
केरळमध्ये बर्ड फ्लूचा नवा प्रादुर्भाव
राहुल गांधी भारतविरोधी मोहीम राबवताहेत
चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या श्रीलंकेला ४५० दशलक्ष डॉलर्सचे मदत पॅकेज
त्यांनी तीन तलाकवर बंदी घालण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचेही कौतुक केले. तसेच आपल्या सारख्या प्रकरणांमध्ये लवकर न्याय मिळावा यासाठी कडक कायद्यांची मागणी केली. इस्लाममध्ये धार्मिक कायद्यांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत त्या म्हणाल्या की ज्या प्रकारे तीन तलाक विधेयक मंजूर झाले, त्यातून महिलांचा पाठिंबा आणि आशीर्वाद दिसून येतो. त्यांच्या मते, या अन्यायकारक प्रथेचा अंत झाल्यानंतर महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.







