देवरुखे ब्राह्मण संघाचा हिरक महोत्सव नुकताच पार पडला. या कार्यक्रमात कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि उद्योगपती प्रशांत कारुळकर यांना “देवरुखे भूषण पुरस्कारा”ने सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रशांत कारुळकर यांना गौरवण्यात आले. रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी “देवरुखे ब्राह्मण संघ, डोंबिवली” यांचा हिरक महोत्सव सोहळा संपन्न झाला. “देवरुखे भूषण पुरस्कारा”ने सन्मानित केल्यानंतर प्रशांत कारुळकर यांनी त्यांना आनंद झाल्याचे म्हणत सर्वांचे आभार मानले.
प्रशांत कारुळकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “सोहळ्यात माझ्या देवरुखे ब्राह्मण कुटुंबाकडून मिळालेला ‘देवरुखे भूषण पुरस्कार’ स्वीकारताना मला खूप खूप आनंद झाला. सर्व मान्यवरांचे, प्रमुख पाहुण्यांचे, कार्यक्रमात उपस्थित माझ्या सर्व ज्ञाती-बंधूभगिनींचे आणि आयोजकांचे मनापासून आभार. मला मिळालेले १०,००० रुपयांचे रोख पारितोषिक हे माझ्यासाठी माझ्या कोणत्याही कंपन्यांच्या शेअर्सपेक्षा किंवा इतर कोणत्याही आर्थिक लाभांपेक्षा अधिक मौल्यवान आहे.” पुढे ते म्हणाले की, त्यांना देण्यात आलेले रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह हे अत्यंत मोलाचे असून आपण देवरुखे आणि कोकणकर असल्याचा सदैव अभिमान राहील.
पुरस्कार देताना देवरुखे ब्राह्मण संघाने प्रशांत कारुळकर यांना रोख, सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र दिले. सन्मान पत्रावर प्रशांत कारुळकर यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला असून यशाचा आलेख मांडण्यात आला आहे. “अर्थमूलो हि धर्मकामी” म्हणजे अर्थ हे सर्व पुरुषार्थांचे मूळ असते या आर्यचाणक्यांच्या उक्तीला अनुरूप असा प्रशांत कारुळकर यांचा जीवनप्रवास असल्याचे सन्मान पत्रात म्हटले आहे. प्रशांत कारुळकर यांनी सकारात्मक दृष्टिकोन आणि अंगभूत कौशल्यांच्या जोरावर व्यावसायिक क्षेत्रातील अनेक शिखरे पादाक्रांत केली असून हे भारतीय म्हणून सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा:
ऊर्जा क्षेत्रात क्रांतीची नांदी; तारांशिवाय वाहिली वीज! प्रकरण काय?
अमेरिका- फ्रान्स टॅरिफ युद्ध: फ्रेंच वाइनवर २०० टक्के टॅरिफ लावणार
भारत- बांगलादेश तणावादरम्यान ‘चिकन नेक’जवळ चीनी राजदूतांचा दौरा
ग्रीनलँड आणि अमेरिका संघर्ष चिघळणार? अतिरिक्त सैन्याच्या उपस्थितीने पडले प्रश्न
स्थावर मालमत्ता, गृहकर्ज, विमा, प्रसारमाध्यमे, वाळू उत्खनन, औषधविज्ञान, सौरऊर्जा, शेअरमार्केट, इत्यादी क्षेत्रांमधील प्रशांत कारुळकर यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल सन्मान पत्रात उल्लेख आहे. यासोबत इतर अनेक यशस्वी टप्प्यांचा देखील समावेश केला आहे. प्रशांत कारुळकर यांच्या समाजकार्याबद्दलही लिहिण्यात आले आहे.
