29 C
Mumbai
Friday, December 5, 2025
घरविशेषधनंजय मुंडे यांच्या कारला अपघात, छातीला मार

धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात, छातीला मार

Dhananjay Munde Car Accident: NCP Leader

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना अपघात झाला आहे. मंगळवारी रात्री परळीमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये मुंडे यांना छातीला मार लागला आहे. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु तरीही त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत पाठवण्यात येणार आहे.

दिवसभरातील मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून येत असताना परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी हा अपघात झाला. . रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास मुंडे यांच्या कारला अपघात झाला. वाहनचालकांचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला . धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून ट्विटरवर अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून रात्री परळीकडे परत येताना हा अपघात झाला. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे छोटासा अपघात झाला असून धनंजय मुंडेंना किरकोळ दुखापत झाली आहे अशी माहिती धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

‘आपला पेहराव योग्य, उचित असावा एवढे सामाजिक भान बाळगले पाहिजे’

आव्हाड थोडी लाज बाळगा…

धरणबहाद्दराला गोमुत्र पाजा आंदोलनाने अजित पवारांचा निषेध

कंझावाला प्रकरणी तातडीने अहवाल सादर करा!

मुंडे यांना अपघातानंतर परळीतून लातूर येथे नेलं जाणार आहे. त्यानंतर पुढील उपचारांसाठी विशेष विमानाने त्यांना मुंबईत आणण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रात्री तीन वाजता अपघात झाल्याने त्या बद्दल फारसे कोणाला माहिती नव्हते. सकाळी ही बातमी समजली. त्यांनतर मुंडे यांचे कार्यरत अस्वस्थ झाले आहेत. रात्री तीन वाजता अपघात झाल्याने त्या बद्दल फारसे कोणाला माहिती नव्हते. सकाळी ही बातमी समजली. त्यांनतर मुंडे यांचे कार्यरत अस्वस्थ झाले आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा