स्पाय थ्रिलर अशा ‘धुरंधर’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘धुरंधर’ने केवळ १० दिवसांत ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. रणवीर सिंगची भूमिका असलेला हा चित्रपट आता वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनण्याच्या तयारीत आहे. तसेच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील कमाई अशीच सुरू ठेवली तर तो वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे.
‘धुरंधर’ दुसऱ्या रविवारी भारतात ५९ कोटींची कमाई केली आणि दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी देशांतर्गत कमाईत १४४.५० कोटींची कमाई केली, जी पहिल्या आठवड्याच्या तुलनेत ४०% ने जास्त आहे. चित्रपटाने फक्त १० दिवसांत भारतात ३५१.७५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईची गती पाहता, सिनेमा ६०० कोटींच्या कमाईच्या उंबरठ्यावर पोहोचेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
रविवारी, धुरंधरने जगभरातील ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाच नाही तर अलिकडच्या काळातल्या अनेक मोठ्या हिट चित्रपटांच्या कलेक्शनलाही मागे टाकले. ‘धुरंधर’ची ५३० कोटी रुपयांची कमाई रजनीकांतच्या कुली (५१८ कोटी), शाहरुख खानचा डंकी (४७० कोटी), हृतिक रोशनचा वॉर (४४९ कोटी) आणि अल्लू अर्जुनचा पुष्पा: द राईज (३६५ कोटी) या अंतिम जागतिक कलेक्शनपेक्षा जास्त आहे.
हे ही वाचा:
पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या माजी आमदाराची काँग्रेसमधून हकालपट्टी
पंतप्रधान मोदींचा इथिओपिया दौरा; काय असणार चर्चेचा अजेंडा?
इस्रायली सैन्याकडून दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या वरिष्ठ दहशतवाद्याचा खात्मा
पाकिस्तानी पिता- पुत्राने केला सिडनीमधील हल्ला! पोलिसांनी काय दिली माहिती?
आदित्य धर दिग्दर्शित, ‘धुरंधर’ हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला असून प्रेक्षकांनी सिनेमाला आणि कलाकारांच्या अभिनयाला पसंती दिली आहे.







