रणवीर सिंह, अक्षय खन्ना, आर. माधवन यांच्या अभिनयाने नटलेला चित्रपट धुरंधर लोकांच्या पसंतीस उतरला असून गेल्या पाच दिवसात चित्रपटाने १५० कोटींचा टप्पा पार केला होता.
‘धुरंधर’, ५ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, हा रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनिंग देणारा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे, याने ‘पद्मावत’ आणि ‘सिंबा’ सारख्या त्याच्या आधीच्या मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत.
आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंहसोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांसारखी मोठी नावे आहेत. तसेच बालकलाकार साराह अर्जुनचा हा डेब्यू चित्रपट आहे.
चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चर्चा रंगत होती आणि त्यामुळे रविवारची कमाई शुक्रवारीच्या तुलनेत प्रचंड वाढली. सोमवारीही फिल्मने चांगली पकड राखली आणि २० कोटींच्या वर कमाई केली, जी या तुलनेत मोठी मानली जाते. सोमवारी घसरण ही सामान्य असते आणि सर्व चित्रपटांमध्ये दिसतेच.
रोजची कमाई अशी
- दिवस १ (शुक्रवार): २८ कोटी
- दिवस २ (शनिवार): ३२ कोटी (१४% वाढ)
- दिवस ३ (रविवार): ४३ कोटी
- दिवस ४ (सोमवार): २३ कोटी
- दिवस ५ (मंगळवार): २६.५० कोटी
- भारतातील कमाई (५ दिवसांपर्यंत): १५२.७५ कोटी (सकनिल्कनुसार)
हे ही वाचा:
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूवर लक्ष
मायक्रोसॉफ्ट भारतात १.५ लाख कोटी रुपये गुंतवणार
बडतर्फ शिपाई आलोक सिंह, अमित सिंह टाटाला न्यायालयीन कोठडी
चित्रपटाने सोशल मीडियावर मोठा गाजावाजा निर्माण केला आहे. गाणीही प्रचंड व्हायरल होत आहेत, त्यामुळे आठवडाभर तरी चित्रपटाची कमाई दोन आकडी राहण्याची शक्यता आहे. चित्रपट अपेक्षेप्रमाणेच उत्तम कामगिरी करत आहे.
अक्षय खन्ना गेल्या काही चित्रपटात चांगलाच चर्चेत आहे. छावा मध्ये त्याची औरंगजेबाची भूमिका लोकांना प्रचंड आवडली होती आता धुरंधर मध्येही त्याच्या भूमिकेने लोकांची मने जिंकली आहेत. विशेष म्हणजे त्याचे एका गाण्यातील नृत्य सगळ्यांना भावले आहे.







