27 C
Mumbai
Saturday, February 21, 2026
घरविशेषभारत-पाकिस्तान सामना पाहू नका, टीव्ही बंद ठेवा!

भारत-पाकिस्तान सामना पाहू नका, टीव्ही बंद ठेवा!

पहलगाम हल्ल्यातील हुतात्मा जवानाच्या पत्नीची भावनिक मागणी

Google News Follow

Related

‘आशिया कप २०२५’ मध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एएनआयशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं, “बीसीसीआयने भारत-पाकिस्तान सामना स्वीकारायलाच नको होता. बीसीसीआयला त्या २६ शहीद कुटुंबांबद्दल काडीचीही संवेदना नाही, असं वाटतं.

त्या पुढे म्हणाल्या, ”आपल्या देशाचे क्रिकेटपटू काय करत आहेत? असे म्हटले जाते की क्रिकेटपटू राष्ट्रवादी असतात, हा आपला राष्ट्रीय खेळ मानला जातो. पण १-२ खेळाडूंना सोडता, कुणीच पुढे येऊन म्हटलं नाही की पाकिस्तानविरुद्धचा सामना बहिष्कृत करायला हवा.”

ऐशान्या पुढे म्हणाल्या, “बीसीसीआय त्यांना बंदुकीच्या जोरावर खेळायला लावत नाही. त्यांनी आपल्या देशासाठी ठाम भूमिका घ्यायला हवी होती, पण ती घेतलेली दिसत नाही. मी प्रायोजक आणि ब्रॉडकास्टर्सना विचारू इच्छिते — त्या २६ कुटुंबांसाठी त्यांची देशभक्ती संपली का?”

ऐशान्या द्विवेदी यांनी सामना आयोजित करण्याच्या आर्थिक बाजूकडे लक्ष वेधलं, “या सामन्यातून मिळणारा महसूल कशासाठी वापरण्यात येईल? पाकिस्तान तो पैसे दहशतवादासाठी वापरेल. पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे. तुम्ही त्यांना महसूल देऊन पुन्हा आमच्यावर हल्ला करण्याची तयारी करून देता, हे मला समजत नाही.”

हे ही वाचा : 

घाटकोपरमध्ये कार फुटपाथवर चढली; कार चालक तरुणी पोलिसांच्या ताब्यात

शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे नामांतर?, कर्नाटक सरकारच्या चर्चेवर अतुल लोंढेंचा खुलासा!

पटना दौऱ्यात काय बोलणार जे. पी. नड्डा

कंगनंग जलाशय : ५२ दिवसांनी पहिल्यांदा वाढला पाणी साठा

शेवटी, जनतेला आवाहन करत त्यांनी म्हटलं, “मी सर्व जनतेला विनंती करते की हा सामना बहिष्कृत करा. स्टेडियममध्ये जाऊ नका, टीव्हीही चालू करू नका.” दरम्यान, या वक्तव्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्याच्या राजकारणावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा