आजकाल पालक आपल्या मुलांच्या योग्य शारीरिक विकासाबाबत खूप चिंतित असतात. विशेषतः उंचीबाबत त्यांना अधिक काळजी वाटते. यामागे अनेक कारणे असू शकतात – जसे की आनुवंशिकता, पोषणाची कमतरता किंवा इतर शारीरिक मर्यादा. अशा वेळी योग हा एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे, जो मुलांच्या संपूर्ण शारीरिक आणि मानसिक विकासास मदत करू शकतो. योगासनांमुळे केवळ शरीर लवचीक होत नाही, तर मानसिकदृष्ट्याही मुले मजबूत होतात.
चक्रासन – ‘चक्र’ म्हणजे चाक आणि ‘आसन’ म्हणजे मुद्रा. या आसनात शरीर मागे वाकवून चाकाच्या आकारात आणले जाते. हे आसन पाठदुखीपासून आराम देते, पाठीचा कणा लवचीक बनवते आणि संपूर्ण शरीरात ताण निर्माण करून मजबुती प्रदान करते. यामुळे शरीराचा विकास आणि उंची वाढण्यास मदत होते. ताडासन – ‘ताडासन’ ला ‘पाम ट्री पोज’ किंवा ‘माउंटन पोज’ असेही म्हणतात. आयुष मंत्रालयाच्या मते, ताडासन नियमित केल्यास मुलांची एकाग्रता, समतोल क्षमता आणि शरीराचा पोश्चर सुधारतो. हे एक सोपे पण प्रभावी आसन आहे. पश्चिमोत्तानासन – या आसनात शरीर पुढे झुकवले जाते. त्यामुळे पाठीचा कणा, हॅमस्ट्रिंग्ज आणि पिंडऱ्यांच्या स्नायूंना ताण येतो. हे आसन केल्याने शारीरिक लवचीकता वाढते, तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते. अभ्यासाचा किंवा कॉम्पिटिशनचा तणाव झेलणाऱ्या मुलांसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे.
हेही वाचा..
कॅप्टन नीकेझाकू केंगुरीज : कारगिलचे शूर ‘नींबू साहेब’ यांची कहाणी
आपत्तीच्या १४ दिवसांनंतर मंडी जिल्ह्यात शाळा सुरु
‘उदयपूर फाईल्स’वरील बंदीविरोधात याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार
‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ कुणाचे हे ऑगस्टमध्ये स्पष्ट होईल?
धनुरासन – या आसनात शरीर धनुष्यासारखे वाकवले जाते. यामुळे पाठीच्या कण्यावर गहिरा ताण येतो, जो कणा लांब व लवचीक बनवतो. वाढत्या वयातील मुलांसाठी हे फार उपयुक्त आहे, कारण लवचीक आणि बळकट पाठ ही उंचीसाठी अत्यंत महत्त्वाची असते. वृक्षासन – वृक्ष म्हणजे झाड. या आसनात शरीराची स्थिती झाडासारखी स्थिर आणि उभी होते. या आसनामुळे पाय मजबूत होतात, शरीराचा समतोल सुधरतो, आणि पाठीच्या आणि कंबरेच्या स्नायूंना ताकद व लवचीकता प्राप्त होते. या सर्व योगासने नियमित पद्धतीने केल्यास मुलांच्या उंची वाढण्यास, शरीराच्या लवचीकतेस आणि मानसिक स्थैर्याला मोठी मदत होते. तथापि, योग प्रशिक्षकांचा सल्ला घेऊनच योग्य प्रकारे आणि योग्य वेळेत योगाभ्यास करावा, म्हणजे जास्तीत जास्त लाभ मिळू शकतो.







