भारत आणि पाकिस्तानमध्ये काल युद्धबंदी झाली. मात्र, युद्धबंदीनंतरही पाकिस्तानने नेहमीप्रमाणे आपले गुण दाखवत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत अनेक ठिकाणी गोळीबार केला. पाकिस्तानच्या या कृतीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा वाकडा आहे.’ जर त्याने त्याच्या कारवाया थांबवल्या नाहीत तर पंतप्रधान मोदी त्याचे शेपूट कापून टाकतील. पाकिस्तानच्या हेतूंवर विश्वास ठेवता येत नाही, म्हणूनच युद्धबंदी झाल्यानंतरही पंतप्रधान मोदींनी कोणतेही ट्विट केले नाही किंवा कोणतीही टिप्पणी केली नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
‘दोन्ही देशांच्या संमतीने युद्धबंदी झाली होती. भारत नेहमीच आपल्या वचनबद्धतेचे पालन करतो. पण पाकिस्तानची ही कृती बेईमान आहे. पाकिस्तानने काल शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. परंतु, भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. याआधीही पाकिस्तानने अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारतीय सेना पूर्णपणे तयार आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांना सुधारण्याची संधी दिली पण मला वाटत नाही की ते सुधारतील. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळाले आहे. आमचे सैन्य पूर्णपणे सज्ज आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हे ही वाचा :
बांगलादेश: शेख हसीनांच्या अवामी लीगवर बंदी!
‘भारताने ९० मिनिटांत ११ एअरबेस उद्ध्वस्त केले’
‘भारत-पाकिस्तान युद्धामुळे विनाश होऊ शकला असता’
पाकिस्तानचे शेपूट वाकडेच! शस्त्रसंधी तीन तासात मोडली, भारतीय लष्कराला अधिकार
ते पुढे म्हणाले, पाकिस्तानला माहिती आहे कि भारता बरोबर लढणे सोने नाही, जर लढलो तर हार निश्चित आहे आणि आपला नामोनिशानही मिटून जाईल. कुत्र्याचे शेपूट सरळ नसून ती वाकडी असते, त्यामुळे तिला सरळ करण्यासाठी कापावी लागते. जर पाकिस्तान सुधारला नाहीतर देशभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची शेपूट कापून टाकतील.







