बिहारच्या प्रारूप मतदार यादीतून वगळलेल्या ६५ लाख मतदारांची यादी आयोगाने जाहीर केली आहेत. ही यादी जनतेसाठी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. बिहारमध्ये विशेष सघन सुधारणा (SIR) नंतर निवडणूक आयोगाने प्रकाशित केलेल्या मसुदा यादीतून ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली होती त्यांची नावे या यादीत समाविष्ट आहेत. जाहीर केलेल्या यादीमध्ये मतदारांना त्यांची नावे सहज तपासता यावीत यासाठी निवडणूक आयोगाच्या बिहार वेबसाइटवर एक नवीन लिंक सक्रिय करण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ५६ तासांच्या आत सगळी माहिती जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील मतदार आणि राजकीय पक्षांना उर्वरित १५ दिवसांच्या कालावधीत त्यांचे दावे आणि आक्षेप दाखल करावे. त्यांनी स्पष्ट केले की, १ सप्टेंबरनंतर कोणत्याही त्रुटी आढळल्यास त्या निरर्थक ठरतील. यासह आयोगाने स्पष्ट केले आहे की, २२ लाख मतदार मृत्यूमुळे, ३६ लाख स्थलांतर किंवा अन्य कारणांनी अनुपस्थित होते, आणि ७ लाख मतदाता दोन ठिकाणी नोंदणी झाल्यामुळे यादीतून वगळण्यात आले आहेत.







