28 C
Mumbai
Wednesday, December 17, 2025
घरविशेषएल्विश यादवने पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरविल्याची दिली कबुली!

एल्विश यादवने पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरविल्याची दिली कबुली!

पोलिसांच्या चौकशीत खुलासा

Google News Follow

Related

रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष वापरल्याप्रकरणी एल्विश यादवला काल (१७ मार्च) न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.दरम्यान, एल्विश यादवच्या चौकशीत अनेक माहिती उघड होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान एल्विशने नोएडामध्ये झालेल्या पार्टीदरम्यान सापाचे विष पुरवल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना पार्टीदरम्यान भेटल्याची कबुलीही त्याने दिली आहे.

एल्विश यादव अनेक दिवसांपासून वादात आहेत. अलीकडेच, एल्विश प्रसिद्ध यूट्यूबर सागर ठाकूरसोबत झालेल्या भांडणामुळे चर्चेत आला होता. याआधीही त्याने एका मुलाला थप्पड मारली होती, ज्याचा व्हिडिओ समोर आला होता. चार महिन्यांपूर्वी आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीमध्ये नशेसाठी सापाचे विष वापरल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी रविवारी एल्विश यादवला अटक केली आणि नंतर त्याला सूरजपूर येथील विशेष न्यायालयात हजर केले.न्यायालयाने एल्विश यादवला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.यानंतर एल्विश यादवची ग्रेटर नोएडातील कसना येथील लक्सर जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

हे ही वाचा:

कोलकात्यात पाच मजली इमारत झोपड्यांवर कोसळली!

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला सात हजार कोटींची देणगी!

‘निवडणूक रोखे कोणी दिले, माहीत नाही’

अजमेरमध्ये साबरमती एक्स्प्रेसला अपघात; मालगाडीला धडकून चार डबे रुळावरून घसरले

दरम्यान, गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर रोजी नोएडाच्या सेक्टर ५१ मधील बँक्वेट हॉलमध्ये एक कार्यक्रम पार पडला होता.या कार्यक्रमात एल्विश यादवने सापाचे विष पुरविले होते, असा आरोप त्याच्यावर ठेवला गेला.या प्रकरणी नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दंड संहिता (IPC) च्या वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ , कलम १२०B (गुन्हेगारी कट), २८४ (विषबाधाशी संबंधित निष्काळजी वर्तन) आणि २८९ (प्राण्यांशी संबंधित निष्काळजी वर्तन) या तरतुदींनुसार हे प्रकरण नोंदवले गेले आहे.एनडीपीएस कायद्यांतर्गत एल्विश दोषी आढळल्यास त्याला १० वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा