राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ३१ मे पर्यंत राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. गड किल्ल्यांवरील वाढलेल्या अतिक्रमणावर राज्यातील विविध हिंदू संघटना आणि शिवभक्त नाराजी व्यक्त करत वारंवार आवाज उठवत आहेत. आता मात्र लवकरच कारवाईला सुरवात होणार असून अतिक्रमणामुळे गुदमणारे किल्ले आता मोकळा श्वास घेणार आहेत.
३१ जानेवारीपर्यंत सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिक्रमणांची यादी मागवली आहे. १ फेब्रुवारी ते ३१ मे पर्यंत टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून दक्षता समितीची नेमणूक देखील करण्यात आली आहे. राज्यात केंद्र संरक्षित ४७ किल्ले आणि राज्य संरक्षित ६२ किल्ले आहेत. तर असंरक्षित किल्ल्यांची संख्या ३०० च्या दरम्यान आहे. या किल्ल्यांवरील सौंदर्य जतन करण्याचे काम केले जाणार आहे. त्याअनुषंगाने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. किल्ल्यांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोल्हापुरातील विशाळ गडावर झालेल्या अतिक्रमणानंतर गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विशाळ गडावरील अतिक्रमण काढण्याविरोधात मोठा राडा झाला होता. विशाळगडाप्रमाणे राज्यातील अनेक गड किल्ले देखील अतिक्रमित असल्याची बाब समोर आल्यानंतर सरकारने त्याबाबत काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, अशी प्रकारची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. त्यापार्श्वभुमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
हिंदुत्वादी सरकार 🚩
जय भवानी जय शिवाजी…🙏हिंदवी स्वराज्याच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांवर अतिक्रमण केलेल्या ठिकाणी बुलडोझर फिरवला जाणार…
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कमिटी स्थापन… pic.twitter.com/gnccVoLIke
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 20, 2025
हे ही वाचा :
‘WHO’ are you? ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे केली पाठ
छत्तीसगड- ओडिशा सीमेवरील गरियाबंदमध्ये १४ नक्षलवादी ठार
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात दिसले भारताचे महत्त्व; जयशंकर यांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान
मुस्तफा काग्गा टोळीच्या चार गुंडांचा उत्तर प्रदेश एसटीएफकडून खात्मा







