अमेरिकेतून एका मोठ्या विमान अपघाताची बातमी येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात अमेरिकन नौदलाचे F-३५ लढाऊ विमान कोसळले आहे. वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला.
बुधवारी (३० जुलै) संध्याकाळी ही अपघाताची घटना घडली.
अमेरिकन नौदलाने विमान अपघाताबाबत एक प्रेस स्टेटमेंट जारी केले आहे. निवेदनानुसार, बुधवारी कॅलिफोर्नियातील नेव्हल एअर स्टेशन लेमूरजवळ अमेरिकन नौदलाचे एफ-३५ लढाऊ विमान कोसळले. निवेदनात म्हटले आहे की अपघाताच्या वेळी पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला आणि संध्याकाळी ६:३० च्या सुमारास झालेल्या अपघाताच्या कारणांचा तपास केला जात आहे.
हे विमान ‘स्ट्राइक फायटर स्क्वॉड्रन VF-१२५’ ला देण्यात आले होते, ज्याला “रफ रेडर्स” म्हणूनही ओळखले जाते, असे नौदलाने सांगितले. VF-१२५ फ्लीट रिप्लेसमेंट स्क्वॉड्रन म्हणून काम करते, ज्याला F-३५ चालवण्यासाठी वैमानिक आणि एअरक्रूला प्रशिक्षण देण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
हे ही वाचा :
इराण तेल व्यापाराबद्दल अमेरिकेने बंदी घातलेल्या कंपन्यांमध्ये ६ भारतीय कंपन्या!
आता अमेरिका पाकिस्तानचे तेल काढणार
भारतावर २५ टक्के कर, ट्रम्प म्हणतात- आम्ही वाटाघाटी करत आहोत!
नौदलाने आपल्या निवेदनात पुष्टी केली की वैमानिक बाहेर पडण्यात यशस्वी झाला आणि तात्काळ कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान, वैमानिकाच्या प्रकृतीबद्दल किंवा अपघातामुळे झालेल्या कोणत्याही नुकसानाबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली नाही. अपघाताबाबत अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. एफ-३५ हे जगातील सर्वात आधुनिक ५ व्या पिढीचे विमान मानले जाते. सध्या ते जगातील सर्वात महागडे विमान देखील आहे.
