मुंबईतील माहीम परिसरात कबुतरांना खाद्य घालणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात माहीम पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २७० आणि २७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एल.जे. रोडवर चारचाकी वाहनातून खाद्य टाकण्यात आल्याच्या तक्रारीनंतर करण्यात आली.
दादर येथील कबूतरखान्यात पक्ष्यांना अन्न घालण्यावर उच्च न्यायालयाने पूर्वीच बंदी घातली असूनही, नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याने न्यायालयाने यापूर्वी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर संबंधित प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते.
हे ही वाचा :
दिल्लीमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल
मतदार यादीवरील तेजस्वी यादव यांचा दावा ‘खोटा’
संजय भंडारीची मालमत्ता जप्त करण्यासाठी ईडी कोर्टात
पुणे: यवतमध्ये ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल, २१ लोक ताब्यात, सध्या परिस्थिती सामान्य!
मुंबईत अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा असून, यामुळे इतर ठिकाणच्या नागरिकांनाही इशारा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या आणि न्यायालयाच्या आदेशाला दूषित करणाऱ्या कृतींविरोधात आता कडक पावले उचलली जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.







