भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना आता ‘ओल्ड ट्रॅफर्ड’ मॅंचेस्टरच्या ऐतिहासिक मैदानावर रंगणार आहे. या मैदानावर अनेक महान खेळाडूंनी खेळ केलाय, पण आजवर फक्त चार फलंदाज असे आहेत ज्यांनी येथे तब्बल तीन शतके झळकावली आहेत. चला जाणून घेऊया या अजरामर फलंदाजांबद्दल…
💥 १. कथबर्ट गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडीज)
1976 ते 1988 दरम्यान ग्रीनिजने येथे 4 कसोटी सामने खेळले. फक्त 5 डावांमध्ये त्यांनी 100.60 च्या अविश्वसनीय सरासरीने 503 धावा केल्या. त्यांची सर्वोच्च खेळी होती – 223 धावा.
💥 २. डेनिस कॉम्पटन (इंग्लंड)
1939 ते 1955 या काळात कॉम्पटनने ओल्ड ट्रॅफर्डवर 8 कसोट्या खेळल्या. 13 डावांमध्ये त्यांनी 81.80 च्या सरासरीने 818 धावा केल्या. त्यात 3 शतकांसह 4 अर्धशतकांचाही समावेश आहे. सर्वोच्च खेळी – 158 धावा.
💥 ३. अॅलिस्टेअर कुक (इंग्लंड)
2006 ते 2017 या काळात खेळलेल्या 8 कसोट्यांमध्ये कुकने 13 डावांमध्ये 685 धावा केल्या, सरासरी 57.08. त्यांनी येथे 3 शतके आणि 3 अर्धशतके केलीत. सर्वोच्च धावा – 127.
💥 ४. अॅलेक्स स्टिव्हर्ट (इंग्लंड)
1992 ते 2002 मध्ये 9 कसोट्यांत त्यांनी 14 डावांमध्ये 704 धावा केल्या. सरासरी होती 58.66. स्टिव्हर्टने येथे 3 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले. सर्वोच्च खेळी – 164 धावा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध.
🏏 पण थांबा… सर्वाधिक शतकं नाहीत, तरी मॅंचेस्टरचा ‘राजा’ आहे जो रूट!
जो रूट याने ‘ओल्ड ट्रॅफर्ड’वर आजवर 11 कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यात 19 डावांमध्ये 978 धावा केल्या आहेत, सरासरी 65.20!
त्याने येथे 254 धावांची भव्य खेळी साकारली आहे, एक शतक आणि तब्बल 7 अर्धशतकं सुद्धा केली आहेत.
📌 शेवटी एकच – शतकांच्या आकड्यांपलीकडे काहीतरी खास आहे या मैदानावरचा अनुभव!
भारत-इंग्लंड सामना ओल्ड ट्रॅफर्डवर रंगणार… आणि इतिहास पुन्हा लिहिला जाण्याची शक्यता!







