भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचा शेवटचा डाव सुरू व्हायच्या आधीच, मैदानावर रणसंग्राम पेटला… मात्र यावेळी सामना बॅट आणि बॉलचा नव्हता — तर शब्दांचा होता!
द ओव्हलच्या मैदानावर मंगळवारी भारताचा सराव सुरू असताना, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि पिच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात प्रचंड शाब्दिक खडाजंगी झाली.
एकीकडे मैदानाच्या प्रत्येक इंचावर लक्ष ठेवणारा ग्राऊंडमन… तर दुसरीकडे जिंकण्याच्या जिद्दीने झपाटलेला प्रशिक्षक…!
सुरुवातीला हळूहळू सुरू झालेला वाद, क्षणात अंगार झाला.
गंभीर थेट संतापले —
👉 “तू फक्त एक ग्राऊंडमन आहेस… लायकीत राहा!”
फोर्टिस भडकला —
👉 “शिव्या दिल्या तर सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार करीन!”
गंभीर पुन्हा डाफरले —
👉 “जा, कर तक्रार… आम्हाला काय करायचं, ते तू नाही ठरवायचं!”
दरम्यान, फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी वाद मिटवायचा प्रयत्न केला, पण गंभीर दूरवरूनही फोर्टिसला सुनावत राहिले. या सगळ्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, जो सोशल मीडियावर सध्या वणव्यासारखा पसरतोय.
📉टीम इंडियावर दबाव?
भारत ४ कसोटीनंतर २-१ ने पिछाडीवर आहे. मॅंचेस्टर कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर संघ लंडनमध्ये दाखल झाला. आता अखेरचा सामना जिंकण्यासाठी मानसिक तयारी सुरू आहे. पण अशा वादामुळे वातावरण तापले आहे हे निश्चित.







