27 C
Mumbai
Thursday, January 8, 2026
घरविशेषगौतम गंभीर भारताचे पुढील मुख्य प्रशिक्षक होण्याची शक्यता

गौतम गंभीर भारताचे पुढील मुख्य प्रशिक्षक होण्याची शक्यता

Google News Follow

Related

इंडियन प्रीमियर लीग विजेत्या संघाचे मेन्टॉर गौतम गंभीर भारतीय वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांच्या जागी नियुक्त होणार आहेत, अशी माहिती ‘इंडिया टुडे’ने दिली आहे. गौतम गंभीर हे आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सशी करारबद्ध असूनही ते ही जबाबदारी घेण्यास तयार आहेत. द्रविड यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपत असून भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) या पदासाठी अर्ज मागवले आहेत. मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ मे होती.

सन २०१७ मध्ये एक खेळाडू म्हणून आयपीएल संघाला राम राम ठोकल्यानंतर गंभीर प्रथमच कोलकाता संघात परतले. दोनवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या या कर्णधाराची कोलकाता आयपीएल संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर कोलकात्याने आयपीएलचे विजेतेपद पटकावले. त्यामुळे गंभीर हे कोलकात्याचे मेंटॉर म्हणून कायम राहण्यास कोणतीही अडचण नसताना ते वरिष्ठ राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाचे आव्हान स्वीकारण्यास तयार आहेत.

याबाबत अनौपचारिक चर्चांमधून बोर्ड आणि गंभीर यांच्यातील गोष्टी पुढे सरकल्याची माहिती सूत्रांनी दिली. गंभीरला सर्वोच्च स्तरावरील प्रशिक्षणाचा पूर्वीचा अनुभव नाही, परंतु आयपीएलमधील मार्गदर्शक म्हणून त्यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे बीसीसीआयच्या दिग्गजांना खात्री पटली आहे की गंभीर हाच योग्य माणूस आहे.

उल्लेखनीय म्हणजे, रविवार, २६ मे रोजी आयपीएल २०२४च्या अंतिम सामन्यात कोलकात्याने हैदराबादला पराभूत केल्यानंतर चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह गौतम गंभीरशी गप्पा मारताना दिसले. टीव्ही कॅमेऱ्यांवर कैद झालेल्या अनौपचारिक गप्पांनी त्यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या चर्चेत आणखी भर घातली.

गंभीर ही योग्य व्यक्ती?

गंभीर यांची भूमिका स्वीकारण्याची शक्यता लक्षात घेऊन बीसीसीआय क्रिकेट सल्लागार समितीमार्फत मुख्य प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेणार का, हे पाहणे बाकी आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी महिन्याच्या सुरुवातीला सांगितले की, शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. मेंटॉर म्हणून गंभीर यांने पहिल्यांदा सन २०२२मध्ये लखनऊ फ्रँचायझीशी करार केला होता. त्यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत, आणि प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्या सोबतीने लखनऊने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. त्यानंतर गंभीर कोलकाता संघात परतला आणि त्याने तिसऱ्या आयपीएलविजेतेपद पटकावण्यासाठी एक प्रचंड प्रतिभावान संघ तयार केला.

हे ही वाचा:

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक

नागपूरमध्ये तापमान ५६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेच नाही

लंडनमध्ये ठाकरेंना घाम फुटणार, निवडणूक आयोग करणार कारवाई

लोकसभा निवडणुकीदरम्यान ११०० कोटी रुपयांची रोकड, दागिने जप्त

आयपीएलमध्ये गंभीर यांचे सिद्ध झालेले मनुष्य-व्यवस्थापन कौशल्य वरिष्ठ राष्ट्रीय संघासाठी उपयुक्त ठरेल, असे मानले जात आहे. बीसीसीआयने न्यूझीलंडचे माजी सलामीवीर मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि हैदराबादचे माजी मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांच्याशी संपर्क साधला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा