१४ जुलै रोजी (स्थानिक वेळेनुसार), बीबीसीने कबूल केले की त्यांची डॉक्युमेंटरी गाझा: हाऊ टू सर्वाइव्ह अ वॉरझोन ही एक प्रचारात्मक चित्रफीत होती. प्रसारित केलेल्या या डॉक्युमेंटरीत संपादकीय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले होते, कारण यात एक महत्त्वाचा हितसंबंध उघड करण्यात आलेला नव्हता. डॉक्युमेंटरीचे निवेदन करणारा मुलगा हा पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासशी संबंधित एका अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे तपासणीतून समोर आले.
हा माहितीपट होयो फिल्म्स या स्वतंत्र कंपनीने तयार केली होती. या वर्षी फेब्रुवारीमध्ये सदर मुलाच्या पार्श्वभूमीबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर ती iPlayer वरून काढून टाकण्यात आली. तपासणीत असे समोर आले की, उत्पादन कंपनीतील किमान तीन सदस्यांना या मुलाच्या वडिलांचा हमासशी असलेला संबंध माहित होता, परंतु हे बीबीसीला कधीच कळवले गेले नाही.
पुनरावलोकन अहवालात बीबीसीवर मूलभूत संपादकीय तपासणी करण्यात अपयश आल्याबद्दल कठोर टीका करण्यात आली. कार्यक्रमाच्या उत्पादन आणि मंजुरी टप्प्यात “महत्त्वाच्या प्रश्नांवर गंभीर देखरेख” झालेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले. मुलाच्या कुटुंबाकडून थेट हस्तक्षेपाचा कोणताही पुरावा आढळला नसला तरी अशा परिस्थितीत मुलाचा वापर “योग्य नसल्याचे” नमूद करण्यात आले आहे.
बीबीसीने मान्य केली चूक, सुधारणा जाहीर
बीबीसी न्यूजच्या सीईओ डेबोराह टर्नेस यांनी एका निवेदनात म्हटले की, संस्थेने आपली चूक मान्य केली आहे आणि अनेक सुधारित उपायांची घोषणा केली आहे, जसे की नवीन देखरेखीच्या नियमांची अंमलबजावणी, निवेदकांची काटेकोर पडताळणी, आणि धोका असलेल्या डॉक्युमेंटरीसाठी अंतर्गत अनुपालन तपासणी.
Campaign Against Antisemitism ने या डॉक्युमेंटरीला सार्वजनिक निधीचा “गैरवापर” ठरवले आणि बीबीसीवर प्रेक्षकांना दिशाभूल केल्याचा आरोप केला. यानंतर, ब्रॉडकास्टिंग नियामक Ofcom ने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
हे ही वाचा:
कचऱ्याच्या डब्याला सोन्याची किंमत, ७० हजार प्रती नग!
नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या
पुणे पोर्श अपघात: अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवला जाणार नाही!
१३ बांगलादेशी नागरिकांना पकडले
माजी नियामकांकडून प्रश्न
पूर्वीचे ITN चे सीईओ व Ofcom चे माजी सामग्री नियंत्रक स्टुअर्ट पर्बिस यांनी उत्पादन कंपनीच्या पारदर्शकतेबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की बीबीसीने दोन ठिकाणी थेट प्रश्न विचारले होते, ज्या वेळी होयो फिल्म्सने मुलाच्या हमासशी संबंधित वडिलांविषयी माहिती उघड करणे आवश्यक होते. परंतु, कंपनीने सोशल मीडियावर तपासणी पारदर्शक असल्याचे सांगून बीबीसीला फसवले.
डॉक्युमेंटरीमध्ये काय दाखवले, काय लपवले
ही डॉक्युमेंटरी जेमी रॉबर्ट्स आणि यूसुफ हम्माश यांनी दिग्दर्शित केली होती. यात गाझामधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर चार मुलांच्या जीवनाचा आढावा घेण्यात आला होता. हे लंडनमधून रिमोटद्वारे दिग्दर्शित करण्यात आले, कारण इस्रायलने आंतरराष्ट्रीय माध्यमांना गाझामध्ये प्रवेश करण्यास निर्बंध घातले होते.
या डॉक्युमेंटरीचे निवेदन १३ वर्षीय मुलाने केले होते, जो नंतर हमासच्या अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे उघड झाले. ही गोष्ट उघड न केल्यामुळे बीबीसीच्या संपादकीय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आणि फेब्रुवारीमध्ये चित्रफीत हटवण्यात आली.
दुसरी गाझा डॉक्युमेंटरीही वादात
गाझा: डॉक्टर्स अंडर अटॅक या दुसऱ्या डॉक्युमेंटरीत impartiality (निरपेक्षता) संदर्भातील चिंता निर्माण झाल्याने तीही प्रसारित करण्यापूर्वीच काढून टाकण्यात आली. यातील एका पत्रकाराने बीबीसी रेडिओ 4 वर इस्रायलविरोधी विधान केले होते, ज्यामुळे ही डॉक्युमेंटरी पुढे चॅनेल 4 वर प्रसारित झाली.
होयो फिल्म्सची माफी
होयो फिल्म्सने बीबीसीच्या तपास अहवालाला मान्यता देत, संपादकीय नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल माफी मागितली आहे. त्यांनी बीबीसीसोबत सुधारित आवृत्ती रिलीज करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले.
डायरेक्टर जनरलची जबाबदारीची ग्वाही
बीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेवी यांनी या प्रकरणात चूक कबूल केली व “विश्वास व पारदर्शकता सर्वात महत्त्वाची” असल्याचे सांगितले. त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे व भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
मार्चमध्येच टिम डेवी यांनी सांगितले होते की, मुलाच्या कुटुंबाबाबत सतत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळे डॉक्युमेंटरी हटवण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला.







