माओवादी नेता देवजीला त्याच्या नातीने पत्र लिहून कळवलं, “हत्यारं खाली ठेवा, घरी परत या”

बसवराजूचे एन्काऊंटर झाल्यानंतर देवजीकडे आली सूत्रे

माओवादी नेता देवजीला त्याच्या नातीने पत्र लिहून कळवलं, “हत्यारं खाली ठेवा, घरी परत या”

प्रमुख माओवादी नेता बसवराजू याच्या चकमकीतील मृत्यूनंतर देशभरात खळबळ उडाली असतानाच, एक भावनिक पत्र आणि व्हिडिओ संदेश समोर आला आहे. ज्यामध्ये माओवादी कमांडर टिपिरी तिरुपती उर्फ देवजी याची नात सुमा टिपिरी आपल्या आजोबांना हत्यारं खाली ठेवून घर परत यावं, अशी साद घालते आहे.

सुमाने तिच्या आजोबांना कधीही प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. ते भूमिगत झाले तेव्हा ती अजून जन्मालाही आली नव्हती. सध्या सुमा तेलंगणातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

आम्हाला तुम्ही हवे आहात

सुमा आपल्या पत्रात लिहिते की, “आदरणीय आजोबा, कृपया घरी या. मी मनापासून तुम्हाला नमस्कार करते. मी नेहमीच तुम्हाला भेटण्याचे स्वप्न पाहिले, पण तशी संधी कधी आलीच नाही. माध्यमांतून तुमच्याबद्दल वाचताना अभिमान वाटतो, पण वेदनाही होते. तिने पुढे म्हटलं, “तुम्ही समतेसाठी सर्व काही दिलं, पण अलीकडचे प्रसंग खूप दुःखद आहेत. तुम्ही बऱ्याच गोष्टी पाहिल्या आणि केल्या, आता आम्हाला तुम्ही हवे आहात. कुटुंब तुमची वाट पाहत आहे. आम्हाला विसरू नका.”

ती म्हणाली, “तुम्ही लोकांसाठी उभे राहिलात, पण आता तुमचे लोक, तुमचं कुटुंब, तुम्हाला हाक देत आहे. कृपया परत या. आम्ही अजूनही वाट पाहतोय. हात पसरून आणि मोकळ्या मनाने.

छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कगार’ या माओवादीविरोधी मोहिमेवरही सुमाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

ती म्हणते, “पाकिस्तान आणि बांगलादेशमधून घुसखोर येतात, त्यांच्यावर अशी मोहीम का नाही चालवली जाते? माओवादी मारले जातात तेव्हा लोक फटाके फोडतात, पेढे वाटतात.  पण हेही शेवटी मानवी प्राणच नाहीत का?” असं ती विचारते.

हे ही वाचा:

शेअर बाजार विश्लेषणाचा चेहरा बदलणारा चेहरा

इस्रायलने हिजबुल्लाहचा टॉप कमांडर मोहम्मद अली जमौलला केले ठार!

“तुच आहेस रे बुमराह!”.. हातातून निसटणारा सामना एका यॉर्करनं वाचवला!

झूठ बोले कौवा काटे…

देवजी : PLGA प्रमुख, बसवराजूनंतर संभाव्य उत्तराधिकारी

देवजी सध्या माओवादी ‘मिलिटरी कमिशन’चा प्रमुख आहे — म्हणजेच PLGA (People’s Liberation Guerrilla Army) चे नेतृत्व त्यांच्या हाती आहे. हेच पद बसवराजूकडे होते, त्याला २०१८ मध्ये CPI (Maoist) चा महासचिव बनवण्यात आलं होतं. २००७ मध्ये दंतेवाडाच्या गीदम पोलीस स्टेशनवरच्या हल्ल्याचं नेतृत्व देवजीने केलं होतं, ज्याला अनेक रक्तरंजित हल्ल्यांची सुरुवात मानली जाते.

पोलीस अधिकाऱ्यांचा इशारा: शरण जा, अन्यथा मृत्यू

बस्तरचे IG पी. सुंदरराज यांनी काही दिवसांपूर्वीच ठाम शब्दांत इशारा दिला होता — “माओवादी कमांडरजवळ केवळ दोनच पर्याय आहेत: शरण या किंवा मारले जा.” आमच्याकडे त्यांच्या हालचालींबाबत सतत माहिती येते. आमचे जवान कधीही त्यांचा खात्मा करू शकतात,” असं ते म्हणाले.

Exit mobile version