काँग्रेसने मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची यादी नुकतीच जाहीर केली होती. यामध्ये २००८ ते २०१४ दरम्यान एकूण ६ सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा काँग्रेसने केला. विशेष म्हणजे, २०१३ मध्ये एकाच वर्षात ३ सर्जिकल स्ट्राईक केल्याचे कांग्रेसने म्हटले होते. दरम्यान, काँग्रेसने पाकिस्तानविरुद्ध एवढ्या मोठ्या कारवाया केल्या पण कोणालाही याची खबर नसणे ही आश्चर्यकरणारी गोष्ट आहेच आणि त्यावेळी पाकिस्तान देखील कसा काय शांत बसला?, हा देखील प्रश्न आहे. आता यावरून भाजपा आमदार अतुल भातखळ यांनी काँग्रेसवर टीका करत त्यांची खिल्ली उडविली आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत, २००८ रोजी पुंछमधील भटाल सेक्टरमध्ये, २०११ रोजी शारदा सेक्टरमध्ये, २०१३ रोजी सवान पात्रा चेकपोस्टवर, नाझापीर सेक्टर, नीलम नदी खोऱ्यात आणि २०१४ रोजी नीलम नदी खोऱ्यात सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली. अशा एकूण ६ सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्याचा दावा काँग्रेस पक्षाने केला आहे.
मोदी सरकारने आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात पाकिस्तान विरुद्ध केलेल्या कारवाईचा डंका देशासह परदेशातही वाजत आहे. यामुळे मोदी सरकारचे कौतुक होत आहे. आता अशा परिस्थितीत काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीमुळे प्रश्न निर्माण केले जात आहेत. मोदी सरकारचे जगभरात कौतुक होत असल्याने काँग्रेसने यादी जाहीर केल्याची चर्चा होत आहे. कारण, जर तश्या कारवाया झाल्या असल्या तर काँग्रेसला त्या सांगण्यासाठी एवढी वर्षे का लागली? आणि ते ही आताच जेव्हा ऑपरेशन सिंदूरची जगभरात चर्चा होत आहे. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी ट्वीटकरत अनेक प्रश्न उपस्थित करत आणि काँग्रेसला टोला लगावला आहे.
हे ही वाचा :
इस्रायलने हिजबुल्लाहचा टॉप कमांडर मोहम्मद अली जमौलला केले ठार!
पाक दहशतवाद्यांनी भारताच्या “नारी शक्ती” ला आव्हान देऊन पायावर कुऱ्हाड मारली!
“तुच आहेस रे बुमराह!”.. हातातून निसटणारा सामना एका यॉर्करनं वाचवला!
ओडिशात खिडकीतून आली एकापाठोपाठ एक नोटांची बंडले!
भातखळकर ट्वीटकरत म्हणाले, झूठ बोले कौवा काटे… २००८ ते २०१४ दरम्यान ६ सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. यात २०१३ मध्ये एका वर्षात ३ सर्जिकल स्ट्राईक केल्याचाही उल्लेख आहे. मात्र या सर्जिकल स्ट्राईकबद्दल काँग्रेसने इतकी गुप्तता पाळली की भारतीय लष्कराला आजतागायत काँग्रेसने सांगेपर्यंत त्याचा थांगपत्ता नव्हता. पाकिस्तानच्याही नकळत झाल्या या सर्जिकल स्ट्राइक.
𝐅𝐨𝐫 𝐘𝐨𝐮𝐫 𝐈𝐧𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐭𝐢𝐨𝐧 👇🏼 pic.twitter.com/kkTLrmr3BS
— Congress (@INCIndia) May 29, 2025
