केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी मंगळवार, ३० डिसेंबर रोजी बेंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) येथे पुढील पिढीतील नागरी हेलिकॉप्टर, ध्रुव- एनजीचे (DHRUV- NG) उद्घाटन केले. एचएएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी के सुनील हे देखील यावेळी उपस्थित होते. नायडू यांनी २०२५ च्या एअरो इंडिया शोमध्ये एचएएलने प्रदर्शित केलेल्या स्वदेशी हेलिकॉप्टरचा नागरी प्रकार असलेल्या अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर, ध्रुव-एनजीच्या उद्घाटन उड्डाणालाही हिरवा झेंडा दाखवला.
एचएएलच्या मते, ध्रुव- एनजी हे ५.५ टन वजनाचे, हलके ट्विन-इंजिन असलेले, बहु-भूमिका असलेले हेलिकॉप्टर आहे जे भारतीय भूभागाच्या विविध आणि आव्हानात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. जागतिक नागरी विमान वाहतूक बाजारपेठेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते विशेषतः अपग्रेड केले आहे. हे हेलिकॉप्टर सुरक्षितता, कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या आरामात वाढ करण्यासाठी डिझाइन केले आहे. हे हेलिकॉप्टर स्वदेशी रोटरी- विंग क्षमतेतील एक मैलाचा दगड आहे.
हे ही वाचा:
… म्हणून बांगलादेशने भारतातील उच्चायुक्तांना बोलावून घेतले
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन; भारताशी कसे होते संबंध?
पुतिन यांच्या निवासस्थानावर ९१ ड्रोन्सचा हल्ला; ट्रम्प काय म्हणाले?
गुणवत्ता तपासणीसाठी १०८ लॅब्सना मंजुरी
ध्रुव- एनजीमध्ये 1H1C इंजिन आहेत, जे उच्च पॉवर देतात. एचएएलने म्हटले आहे की, त्यात AS4 आवश्यकतांचे पालन करणारा नागरी- प्रमाणित ग्लास कॉकपिट आणि आधुनिक एव्हियोनिक्स सूट आहे. यात प्रगत कंपन- नियंत्रण प्रणाली आहेत ज्या व्हीआयपी आणि वैद्यकीय वाहतुकीसाठी तयार केलेल्या, सुरळीत प्रवासाची खात्री देतात. एचएएलच्या मते, ध्रुव- एनजीचे जास्तीत जास्त टेक- ऑफ वजन ५,५०० किलो आहे आणि ते २८५ किमी/ताशी कमाल वेग गाठते. त्याची जास्तीत जास्त १४ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.







