नवीन जीएसटी सुधारणा लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. याअंतर्गत आधी ४ स्लॅब्समध्ये असलेला जीएसटी आता २ स्लॅब्समध्ये आणण्यात आला आहे, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. एका शेतकऱ्याने सांगितले की, “पूर्वीच्या तुलनेत आता खताच्या दरात प्रति पिशवी ₹५० इतकी घट झाली आहे.
तसेच, ट्रॅक्टर खरेदी करताना ₹४० ते ₹५० हजारांचा फरक पडणार आहे, जो आमच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो.” ते पुढे म्हणाले की, “या सुधारणा केवळ शेतकऱ्यांसाठीच नाहीत, तर समाजाच्या प्रत्येक घटकासाठी लाभदायक ठरणार आहेत.”
केंद्र सरकारने लागू केलेल्या या जीएसटी सुधारणा योजनेमुळे देशभरातील शेतकरीवर्गाला आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दुसऱ्या एका शेतकऱ्याने सांगितले की, “या सुधारणेमुळे आम्हा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. उदाहरणार्थ, एक पंप बसवण्यासाठी यापूर्वी ३ ते ४ लाख रुपये खर्च येत होता. मात्र, यंदा त्यात तब्बल ३० ते ४० हजार रुपयांची बचत होईल.” ते पुढे म्हणाले की, “डीएपी खताच्या प्रति पिशवीवर ₹५० ची सूट मिळणार आहे, हेही आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.”
#WATCH | Aligarh, Uttar Pradesh | On implementation of GST reforms, a farmer says, "Earlier the GST used to be in 4 slabs and is now in 2. This will benefit farmers in the long run because Rs 50 per bag has been reduced on fertilizers… There will be a difference of Rs 40-50… pic.twitter.com/HtvXBYytOi
— ANI (@ANI) September 22, 2025
“पंतप्रधान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यादृष्टीने पावले उचलत आहेत. ते खरोखरच शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत आहेत,” असेही त्यांनी नमूद केले. जीएसटी सुधारणांच्या अंमलबजावणीबद्दल आणखी एका शेतकऱ्याने म्हटले, “यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान मोदींनी खूप चांगले काम केले.” दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांवरील खर्चात घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
#WATCH | Aligarh, Uttar Pradesh | On implementation of GST reforms, a farmer says, "This reform holds a great benefit for farmers, for example, a pump installation cost Rs 3-4 lakh, while there will be a difference of Rs 30-40 thousand this year. There will be a reduction of Rs… pic.twitter.com/KH2TkxKTD7
— ANI (@ANI) September 22, 2025
#WATCH | Aligarh, Uttar Pradesh | On implementation of GST reforms, a farmer says, "This has brought a great relief for the farmers… PM Modi did a great work…" pic.twitter.com/If4DvNSWuH
— ANI (@ANI) September 22, 2025







