28 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेष"नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आलेले अर्धा डझन ड्रोन दिसले''

“नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आलेले अर्धा डझन ड्रोन दिसले”

सुरक्षा दलांची मोठी शोध मोहीम सुरू

Google News Follow

Related

नियंत्रण रेषेवरील अनेक भागात पाकिस्तानकडून अर्धा डझन ड्रोन दिसल्यानंतर सुरक्षा दलांनी सोमवारी शोध मोहीम सुरू केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी (२४ ऑगस्ट) रात्री ९.१५ वाजता मेंढर सेक्टरमधील बालाकोट, लंगोटे आणि गुरसाई नाल्यावरून सीमेपलीकडून ड्रोनची हालचाल दिसून आली.

हे ड्रोन अत्यंत उंचावरून उडत होते आणि फक्त पाच मिनिटांतच पाकिस्तान बाजूला परतले. हे ड्रोन सर्व्हिलेन्ससाठी पाठवण्यात आल्याचा संशय आहे. अधिकाऱ्याने सांगितले की,  शस्त्रे किंवा अंमली पदार्थ हवेत टाकले जात नाहीत याची खात्री करण्यासाठी ड्रोनच्या हालचाली ज्या ठिकाणी आढळल्या त्या अनेक भागात दिवसाच्या पहिल्या प्रकाशातच या भागाला वेढा घातला गेला आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानातून भारतात ड्रोनच्या मदतीने शस्त्र, दारूगोळा व औषधांची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे उघड झाले आहे. ही वाढती ड्रोन हालचाल सुरक्षा दलांसाठी गंभीर आव्हान बनली आहे. तस्कर व दहशतवादी गट सीमेपलीकडून ड्रोनद्वारे बेकायदेशीर वस्तू फेकून भारतात पाठवत आहेत. यात प्रामुख्याने हत्यारे, दारूगोळा, नशेचे औषधे अशा वस्तूंचा समावेश आहे.

हे ही वाचा : 

गगनयान मोहिमेसाठी एअर ड्रॉप टेस्ट यशस्वी

राहुल गांधी सीरियल लायर आहेत…

गाझा रुग्णालयावर इस्रायलच्या हल्ल्यात पत्रकारांसह १५ जणांचा मृत्यू!

“बिहारात INDI आघाडीची दिशा भरकटली, लोकांचा विश्वास उडाला”

या पार्श्वभूमीवर जम्मू पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. जर एखाद्या नागरिकाने ड्रोनने टाकलेली वस्तू सापडल्याची माहिती पोलिसांना दिली आणि ती पोलिसांना जप्त केली तर त्या व्यक्तीस ३ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची घोषणा पोलिसांनी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा