हमासने समलैंगिक सदस्यांना फाशी दिली, इस्रायली पुरुष बंधकांवरही झाले अत्याचार!

इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या हाती लागली गुप्त कागदपत्रे

हमासने समलैंगिक सदस्यांना फाशी दिली, इस्रायली पुरुष बंधकांवरही झाले अत्याचार!

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने समलिंगी संबंध असलेल्या त्यांच्याच सदस्यांवर अत्याचार करून त्यांना मृत्युदंड दिला होता, असे गुप्त कागदपत्रांवरून उघड झाले आहे, असे द न्यू यॉर्क पोस्टमधील एका वृत्तात म्हटले आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या (आयडीएफ) हाती गुप्त कागदपत्रे लागल्यानंतर हा मोठा खुलासा झाला.

७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्यात हमास गटाच्या अनेक सदस्यांनी पुरुष इस्रायली पीडितांवर बलात्कार केला होता, असेही या कागदपत्रांमधून उघड झाले आहे. तसेच हल्ल्यानंतर हमासने बंदिवान असलेल्या इस्रायली पुरुषांवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

अहवालानुसार, हमासच्या अशा ९४ सदस्यांवर आरोप आहे. यामध्ये समलैंगिक बोलणे, कायदेशीर संबंध नसताना मुलींशी छेडछाड करणे, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणे आणि मुलांवर अत्याचार करणे अशा आरोपांचा समावेश आहे. हे आरोप २०१२ ते २०१९ पर्यंतचे आहेत आणि हमासच्या गुप्तचर, लष्करी आणि अंतर्गत मंत्रालयात भरती झालेल्या लोकांशी संबंधित आहेत.

हे ही वाचा : 

राहुल गांधींनी माफी मागावी

नव्या आयकर विधेयकाला उद्या मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार !

म्हणून मी भाजपला मतदान केले!

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम नव्या रुपात; नरेंद्र मोदींसोबत दीपिका पदुकोण, मेरी कोम विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन

दरम्यान, गाझामध्ये समलैंगिकता बेकायदेशीर आहे आणि त्यासाठी वर्षानुवर्षे तुरुंगवास किंवा मृत्युदंड होऊ शकतो. २०१६ मध्ये समलिंगी संबंध असल्याच्या आरोपाखाली हमासचा माजी कमांडर महमूद इश्तिवी याला फाशी देण्यात आली होती.

 

Exit mobile version