26 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरविशेषहरियाणा निवडणुकीसाठी भाजपकडून २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर !

हरियाणा निवडणुकीसाठी भाजपकडून २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर !

आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर, अध्याप तीन बाकी

Google News Follow

Related

भारतीय जनता पक्षाने (भाजप) मंगळवारी आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली  आहे. यामध्ये २१ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी भाजपने ६७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.

भाजपने आतापर्यंत ८७ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. केवळ तीन जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा अध्याप बाकी आहे, ज्यामध्ये महेंद्रगड, सिरसा आणि फरीदाबाद एनआयटी जागेचा समावेश आहे. यामध्ये शिक्षण मंत्री सीमा त्रिखा आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री बनवारीलाल यांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. जुलानामध्ये भाजपने कॅप्टन योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली, जे कुस्तीपटू विनेश फोगट विरुद्ध लढणार आहेत.

यादीनुसार, नारायणगडमधून पवन सैनी, पुंद्रीतून सतपाल जांबा, असंधमधून योगेंद्र राणा, गन्नैरमधून देवेंद्र कैशिक, रायमधून कृष्णा गेहलावत, बरैदामधून प्रदीप सांगवान, नरवानामधून कृष्णकुमार बेदी, डबवलीतून बलदेव सिंग मंगियाना, एलेनाबादमधून अमीर चंद  मेहता, रोहतकमधून मनीष ग्रोवर, नरनेलमधून ओम प्रकाश यादव, बावलमधून कृष्णा कुमार, पटाईधीमधून बिमला चौधरी, नूहमधून संजय सिंग, फिरोजपूर झिरकामधून नसीम अहमद, पुन्हानमधून एजाज खान, हातीनमधून मनोज रावत, होडलमधून हरिंदर सिंग रामरतन तर धनेश अधलखा यांना बदखलमधून तिकीट देण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

अजित पवार म्हणतात, अमित शहांसमोर मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला नाही

विनेश फोगटला तिकीट दिल्याने अनेक काँग्रेस नेते नाराज !

राहुल गांधींकडून देशाची प्रतिमा मलीन करण्याचे काम !

आंदोलन सोडा, दुर्गापूजेकडे लक्ष द्या…ममतांच्या वक्तव्यामुळे पीडितेच्या आईकडून संताप

तसेच पेहोवा येथील उमेदवार बदलण्यात आला आहे. आता येथून जय भगवान शर्मा यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. यापूर्वी या जागेवर कवलजीत अजराना यांना उमेदवारी देण्यात आली होती. तीव्र विरोधामुळे कवलजीत सिंग अजराना यांना तिकीट परत करावे लागले होते.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणामध्ये पंतप्रधान मोदींचा पाच प्रचार सभा होणार आहेत. पंतप्रधान मोदी भाजपच्या प्रचाराचा प्रमुख चेहरा असणार आहेत. १४ सप्टेंबर रोजी कुरुक्षेत्रमध्ये मोदींची पहिली प्रचारसभा होणार असल्याची माहिती आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा