30 C
Mumbai
Wednesday, February 4, 2026
घरविशेषचेन्नईत मशिदीबाहेर हसन नसराल्लाहचे बॅनर

चेन्नईत मशिदीबाहेर हसन नसराल्लाहचे बॅनर

Google News Follow

Related

तामिळनाडूमधील हिंदू पीपल्स पार्टी, इंदू मक्कल काचीने एक पोस्ट शेअर केली की हिजबुल्लाह दहशतवादी हसन नसराल्लाह चेन्नईतील एका मशिदीबाहेर मुस्लिम समुदायाकडून त्याचे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. इंदू मक्कल काची यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये हिजबुल्ला दहशतवाद्याचे स्वागत करणारा बॅनर मशिदीबाहेर लावला असल्याचे म्हटले आहे.

नसराल्लाहचा मृतदेह ज्या बंकरमधून तो लपून बसला होता, त्यातून सापडल्याच्या एका दिवसानंतरची ही घटना आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसराल्लाह त्याच्या बंकरमध्ये मारला गेला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी होत असताना त्यांनी या हल्ल्याला मान्यता दिली. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या बेरूतमधील त्याच्या बंकरमधून या दहशतवाद्याचा मृतदेह सापडला.

हेही वाचा..

किमान देवांना राजकारणापासून दूर ठेवा

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर इडीकडून गुन्ह्याची शक्यता

राज्यात गायी राज्यामाता-गोमाता; पोषणासाठी मिळणार अनुदान

धारावीतील मशिदीचे अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात!
नसराल्ला आणि हिजबुल्लाचे इतर नेते भूमिगत बंकरमध्ये बैठक घेत होते. तेव्हा इस्रायलने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात नसराल्लाह आणि इतर हिजबुल्ला नेत्यांचा मृत्यू झाला. यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. काश्मीरमध्ये शेकडो निदर्शक नसराल्लाह यांचे चित्र घेऊन रस्त्यावर उतरले आणि इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी केली. हिजबुल्लाहच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत केवळ पुरुषच नाही तर मोठ्या संख्येने महिलाही निदर्शनात सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान, पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनीही लेबनॉन आणि गाझामधील ‘शहीद’ लोकांसोबत “एकता” म्हणून रविवारी नियोजित त्यांची राजकीय सभा रद्द केली. लेबनॉन आणि गाझाच्या शहीदांसह, विशेषतः हसन नसरुल्लाह यांच्याशी एकजुटीने माझी उद्याची सभा रद्द करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. आम्ही पॅलेस्टाईन आणि लेबनॉनच्या लोकांसोबत या दु:खाच्यावेळी उभे आहोत, असे त्यांनी ट्विट केले होते.

इस्रायली सूत्रांनुसार, हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेचा नेता आणि त्याच्या संस्थापकांपैकी एक हसन नसराल्लाह, हिजबुल्लाहच्या दक्षिण आघाडीचा कमांडर अली कार्की आणि अतिरिक्त हिजबुल्ला कमांडर यांच्यासमवेत खात्मा करण्यात आला. हवाई हल्ल्यांनंतर आयडीएफच्या सूत्रांनी सांगितले होते की, स्ट्राइकमध्ये हिजबुल्लाचा नेता हसन नसराल्लाहला लक्ष्य केले गेले होते. तो त्यावेळी कमांड सेंटरमध्ये होता. बेरूतमधील हिजबुल्लाह तळावर इस्रायली हवाई हल्ल्याने लेबनॉनची राजधानी हादरली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा