30 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरविशेष‘गोव्यातील पोर्तुगीजांच्या खुणा पुसण्याची वेळ आली’

‘गोव्यातील पोर्तुगीजांच्या खुणा पुसण्याची वेळ आली’

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे सूतोवाच

Google News Follow

Related

गोव्यावर ४०० वर्षांहून अधिक काळ राज्य करणाऱ्या पोर्तुगीज राजवटीच्या खुणा पुसून टाकण्याचा निर्धार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे. ‘ पोर्तुगीजांच्या खुणा पुसून टाकण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची वेळ आली आहे. गोवा मुक्ती संघर्षाच्या ६०व्या वर्धापनानिमित्त तरी ते करून दाखवले पाहिजे,’ असे ते म्हणाले.

बेतुल किल्ल्यावर शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘३५० वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी गोव्यातील मंदिरे नष्ट करण्यास सुरुवात केली होती. शिवाजी महाराज गोव्यात आल्यावर त्यांनी नार्वे येथे सप्तकोटेश्वर मंदिर बांधले आणि शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांशी सामना केल्यावरच मंदिरांचा विद्‌ध्वंस होणे थांबले,’ असे सावंत म्हणाले.

पोर्तुगीजांवर शरसंधान करण्याची सावंत यांची ही पहिलीच वेळ नाही. ‘गोवा गरीब नव्हता तर श्रीमंत होता आणि त्यामुळेच ते (पोर्तुगीज) इथे आले. गोव्यावर ४०० वर्षे राज्य करत असताना त्यांनी लूट केली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गोव्याला लोहखनिज आणि इतर नैसर्गिक साधनसंपत्तीचे देणे लाभले होते,’ असे सावंत यांनी गेल्या ऑगस्टमध्ये म्हटले होते.

तर, सन २०२२ मध्ये अर्थसंकल्पीय भाषणात सावंत यांनी पोर्तुगीजांनी गोव्याची संस्कृती पद्धतशीरपणे नष्ट केल्याचे म्हटले होते. “आमची प्रार्थनास्थळे ही आमच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत. गोव्यात अनेक ठिकाणी आपल्याला अनेक मंदिरे जीर्ण आणि दुर्लक्षित अवस्थेत आढळतात. पोर्तुगीज राजवटीत, या सांस्कृतिक केंद्रांना नष्ट करण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला. पर्यटन विकासाचा विचार करून ही मंदिरे आणि स्थळांच्या पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धारासाठी आम्ही २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे,’ असे सावंत यांनी यावेळी सांगितले होते.

हे ही वाचा:

लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले

छत्रपती संभाजीनगरला औरंगाबाद म्हणणाऱ्या शरद पवारांना बोलायची हिंमत संजय राऊतांकडे आहे का?  

गेमिंग ऍपच्या माध्यमातून धर्मांतर प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन, ४०० जणांचे धर्मांतर?

इंदिरा गांधी यांची हत्येचे चित्रण कॅनडातील चित्ररथावर

‘जर भारत २०४७पर्यंत विकसित राष्ट्र होणार असेल तर, देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होईपर्यंत गोव्याला विकसित राज्य बनवण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. सन २०४७पर्यंत गोवा कसा असेल आणि राज्यात कोणता विकास करण्याची गरज आहे, याचा विचार आम्ही आधीच सुरू केला आहे,’ अशी माहिती सावंत यांनी मंगळवारी दिली. डिसेंबर २०२१मध्ये गोवा मुक्ती संघर्षाला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सावंत यांनी पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीला सुरुवात करण्याचा मनोदय व्यक्त केला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा