30 C
Mumbai
Saturday, February 14, 2026
घरविशेषहृदयद्रावक! खेतवाडीत स्कूल बसच्या धडकेत एका वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

हृदयद्रावक! खेतवाडीत स्कूल बसच्या धडकेत एका वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

आजी गंभीर जखमी

Google News Follow

Related

मुंबईतील गिरगाव भागातील खेतवाडी परिसरात आज दुपारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. शाळेतून परतणाऱ्या नातीला घेण्यासाठी गेलेल्या आजी आणि त्यांच्या कडेवर असलेल्या एक वर्षाच्या नातवाला स्कूल बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अवीर व्यास या एका वर्षाच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला, तर आजी गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार रोजी दुपारी १२:१५ च्या सुमारास खेतवाडी येथील ‘नर्मल निकेतन’ इमारतीसमोर एका शाळेची बस मुलांना सोडण्यासाठी आली होती. याच इमारतीत राहणाऱ्या चंद्रकला शिवराम व्यास (वय ६३ वर्षे) या आपल्या नातीला बसमधून घेण्यासाठी खाली गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या कडेवर त्यांचा एक वर्षाचा नातू अवीर व्यास हादेखील होता.
हे हे वाचा:
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या

भारत–युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक व्यापार करार

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा डंका

उत्तराखंड: महिलेला लिफ्ट देऊन चालत्या गाडीत बलात्कार; दोघांना अटक
नातीला बसमधून उतरवून घेतल्यानंतर, आजी दोन्ही मुलांना घेऊन बसच्या समोरून रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी बस चालकाने परिस्थितीचा अंदाज न घेता बस पुढे सुरू केली. बसची धडक लागल्याने चंद्रकला व्यास आणि त्यांच्या कडेवरील अवीर दोघेही खाली फेकले गेले.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी जखमी आजी आणि बालकाला तातडीने जवळच्या रिलायन्स रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी तपासून एक वर्षीय अवीरला मृत घोषित केले. चंद्रकला व्यास यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग (डी.बी. मार्ग) पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित स्कूल बस चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चालक मद्यधुंद होता का किंवा बसमध्ये सुरक्षेचे नियम पाळले होते का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे खेतवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, स्कूल बसच्या चालकांनी विद्यार्थ्यांची ने-आण करताना अधिक खबरदारी घेण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा