अभिनेता आमिर खान अलीकडेच वांद्रे येथील त्याच्या घरातून पोलिसांच्या वाहनांचा ताफा बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्यानंतर चर्चेत आला होता. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला. हे सर्व लोक आमिरच्या घरी का आले होते? यावरून अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यांना भेटण्यासाठी बसमध्ये सुमारे २५ अधिकारी होते असे म्हटले जात आहे. याच दरम्यान आता आमिरच्या टीमने सत्य सांगितले आहे.
आयपीएस अधिकाऱ्यांनी भरलेली बस आमिर खानच्या घरी येण्यामागील खरे कारण आता समोर आले आहे. आमिरच्या टीममधील एका सदस्याने सांगितले की, “सध्याच्या बॅचमधील आयपीएस प्रशिक्षणार्थींनी त्यांच्याशी भेटीची विनंती केली होती आणि आमिर खानने त्यांना त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते.”
एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये अनेक आयपीएस अधिकारी आमिर खानच्या इमारतीत लक्झरी बसने जाताना दिसले. त्यानंतर विविध अफवा पसरू लागल्या. जसे की आमिर एक प्रकल्प करत आहे, ज्यासाठी सुरक्षेची आवश्यकता आहे. परंतु, या भेटीचे कारण समोर आल्यानंतर सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
हे ही वाचा :
थायलंड आणि कंबोडिया यांच्यात युद्धविराम
धर्मांतराच्या मास्टरमाइंड छांगूर बाबाचा पाय खोलात
गौरव गोगोई यांच्या विधानावर ललन सिंह यांचा पलटवार
साजिद इलेक्ट्रिकवाला अपहरण प्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळल्या
दरम्यान, अलिकडेच आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, जो अनेकांना आवडला. सध्या तो चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग करत आहे आणि लवकरच तो आमिर खान प्रॉडक्शनच्या आगामी योजनांबद्दल मोठी घोषणा करणार आहे.
बोलायचे झाले तर सध्या आमिर खानकडे ‘कुली’ हा चित्रपट आहे, ज्यामध्ये तो रजनीकांतसोबत दिसणार आहे. याशिवाय, तो लोकेश कनगराज दिग्दर्शित आणखी एका चित्रपटातही काम करणार आहे. तसेच, त्याने अलीकडेच सांगितले आहे की त्याने त्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘महाभारत’ बद्दल चर्चा सुरू केली आहे. तो त्याची मालिका बनवणार आहे.







