पाकिस्तानच्या आयएसआयच्या वाढत्या उपस्थितीमुळे बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट!

सुरक्षा दलाची सर्व ठिकाणी करडी नजर

पाकिस्तानच्या आयएसआयच्या वाढत्या उपस्थितीमुळे बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट!

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर संस्था आणि सुरक्षा दलांना बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवर उच्च सतर्कता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारवाया आणि पाकिस्तानच्या आयएसआय आणि पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांची वाढती उपस्थिती लक्षात घेता बांगलादेश सीमेवर एजन्सींना अतिरिक्त सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, पाकिस्तान आपल्या बांगलादेशी समकक्ष म्हणजेच त्यांच्या सारखे समान असलेले आणि तेथील कट्टरपंथी इस्लामी गटांशी संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही देशांमधील शत्रुत्व निर्माण झाल्यास भारतासाठी समस्या निर्माण करण्यासाठी पाकिस्तान बांगलादेशच्या सीमेवरील भारतीय भागात पाठिंबा असलेल्या या कट्टरपंथी घटकांचा वापर करण्याची शक्यता आहे.

वक्फ कायद्यावरील निदर्शनांमध्ये बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये झालेल्या दंगलीनंतर भारतीय यंत्रणा बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहेत. मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो जखमी झाले होते. त्यावेळी तपास पथकाने केंद्राला सादर केलेल्या अहवालात म्हटले होते की बांगलादेशी उपद्रवी लोकांनी हा हिंसाचार घडवून आणला होता.
हे ही वाचा : 
दोन पत्रकार परिषदा, दोन संकेत…
एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला!
फौजिया बेगमने ३० वर्षांनी केले जन्मप्रमाणपत्र, सोमय्यांनी केली पोलखोल
भारताने पाकिस्तानी विमानांसाठी हवाई क्षेत्र केले बंद, परिणाम काय?
दरम्यान, भारत पाकिस्तान विरुद्ध मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पाकिस्तान बिथरला असून
मागील काही दिवसांपूर्वी भारताने घेतलेल्या पाच कठोर निर्णयामुळे पाकिस्तानची चांगलीच गळचेपी झाली आहे. यासह भारताने पाकिस्तानी विमानांसाठी हवाई क्षेत्र देखील बंद केले आहे.
Exit mobile version