22 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरविशेषकर्तव्य मार्गावर रचणार इतिहास; काश्मिरी मुलगी करणार सीआरपीएफ पुरुष संघाचे नेतृत्व!

कर्तव्य मार्गावर रचणार इतिहास; काश्मिरी मुलगी करणार सीआरपीएफ पुरुष संघाचे नेतृत्व!

सर्व- पुरुष तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या सिमरन बाला ठरणार पहिल्या महिला अधिकारी

Google News Follow

Related

भारत ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. अशातच २६ वर्षीय असिस्टंट कमांडंट सिमरन बाला देखील भव्य परेडमध्ये एका ऐतिहासिक क्षणासाठी सज्ज झाल्या आहेत. २६ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) सर्व- पुरुष तुकडीचे नेतृत्व करणारी त्या पहिल्या महिला अधिकारी बनणार आहेत.

जम्मू- काश्मीरमधील २६ वर्षीय सीआरपीएफ असिस्टंट कमांडंट सिमरन बाला २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणार आहेत. त्या त्यांच्या दलाच्या सर्व पुरुष तुकडीचे नेतृत्व करतील. हा एक ऐतिहासिक क्षण असेल. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सीआरपीएफच्या सर्व पुरुष तुकडीचे नेतृत्व महिलेने करण्याची ही पहिलीच वेळ असेल. या राष्ट्रीय कार्यक्रमात सिमरन १४० हून अधिक पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुकडीचे नेतृत्व करतील. त्यांचे नेतृत्व हे देशाच्या सुरक्षा सेवांमध्ये महिलांच्या वाढत्या भूमिकेचे प्रतिबिंब आहे.

सिमरन बाला या जम्मू- काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथील रहिवासी आहेत. या ऐतिहासिक क्षणापर्यंतचा त्यांचा प्रवास हा सीमावर्ती भागात त्यांच्या बालपणीच्या अनुभवांनी प्रेरित होता. लहानपणापासूनच तिने सीमेपलीकडून गोळीबार पाहिला. या अनुभवाने तिला केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाद्वारे देशाची सेवा करण्याची प्रेरणा दिली. जून २०२३ मध्ये, सिमरन बाला यांची यूपीएससी सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्सेस (सीएपीएफ) परीक्षेसाठी निवड झाली. ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या त्या जम्मू आणि काश्मीरमधील एकमेव महिला ठरल्या.

हे ही वाचा:

पाक संरक्षण मंत्र्यांकडून बनावट ‘पिझ्झा हट’चे उद्घाटन; खऱ्या कंपनीने पाठवली नोटीस

सनातन धर्मावर द्वेषपूर्ण टिप्पणी करणाऱ्या उदयनिधीचे कान उपटले!

डॉ. अशोक मोडक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी श्रद्धांजली सभा

उद्योजक प्रशांत कारुळकर यांना देवरुखे भूषण पुरस्कार

सिमरन बाला यांनी त्यांचे शालेय शिक्षण नौशेरा येथे पूर्ण केले, त्यानंतर त्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी जम्मूला गेल्या तर, त्यांनी गांधीनगर येथून पदवी प्राप्त केली. पदवीच्या शेवटच्या सत्रात त्यांनी यूपीएससी सीएपीएफ परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या. यानंतर त्यांना गुरुग्राम येथील CRPF अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान, त्यांना प्रशिक्षणातील सर्वोत्तम अधिकारी आणि सर्वोत्तम सार्वजनिक भाषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिमरन एप्रिल २०२५ मध्ये CRPF मध्ये रुजू झाल्या. त्यांची पहिली पोस्टिंग छत्तीसगडमधील ‘बस्तरिया’ बटालियनमध्ये झाली, जिथे त्या नक्षलविरोधी कारवायांमध्ये सहभागी होत्या.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा