‘काकोरी घटने’तील क्रांतिकारांना गृहमंत्र्यांकडून श्रद्धांजली, काय आहे घटना?

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी काकोरी शहीद स्मारकाला भेट दिली

‘काकोरी घटने’तील क्रांतिकारांना गृहमंत्र्यांकडून श्रद्धांजली, काय आहे घटना?

‘काकोरी ट्रेन अ‍ॅक्शन’च्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (९ ऑगस्ट) चंद्र शेखर आझाद, राम प्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान आणि या ऐतिहासिक घटनेत सहभागी असलेल्या इतर स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली. गृहमंत्री शहा म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिकांनी “ब्रिटिश लूटमारी” विरोधात “क्रांतीची मशाल” पेटवली आणि देशाची संपत्ती त्याच्या लोकांना परत देण्याच्या उद्देशाने ट्रेन लुटून ब्रिटिश साम्राज्याचा पाया हादरवला.

एकस्वर ट्वीटकरत गृहमंत्री शहा म्हणाले, “‘काकोरी ट्रेन अ‍ॅक्शन’ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धैर्य, त्याग आणि देशभक्तीचे प्रतीक आहे. ९ ऑगस्ट १९२५ रोजी राम प्रसाद बिस्मिल, चंद्र शेखर आझाद आणि अशफाकुल्ला खान यांच्यासारख्या शूर वीरांनी ब्रिटिश लुटीविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवली आणि ब्रिटिश साम्राज्याचा पाया हादरवला.”

“ब्रिटिशांनी भारतीयांकडून लुटलेली संपत्ती राष्ट्राच्या कल्याणासाठी वापरावी या उद्देशाने, या शूर योद्ध्यांनी ‘काकोरी ट्रेन अ‍ॅक्शन’ मोहीम राबवली. या योद्ध्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा देश नेहमीच ऋणी राहील”, असे गृहमंत्री शहा म्हणाले.

काकोरी घटना आहे तरी काय?

काकोरी ट्रेन अ‍ॅक्शन (Kakori Train Action) हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी घटना होती. हा प्रसंग ९ ऑगस्ट १९२५ रोजी घडला. या घटनेत भारतीय क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या तिजोरीची ट्रेन लुटून ब्रिटिश सरकारविरोधात आपली बंडखोरी दर्शवली. ९ ऑगस्ट रोजी सहारनपूरहून लखनऊला जाणारी ८ डब्यांची रेल्वेगाडी क्रांतिकारकांनी काकोरी येथे रेल्वे थांबवून तिजोरीतील पैसे लुटले. यातून मिळणारा पैसा क्रांतिकारी चळवळीसाठी वापरण्याचा क्रांतिकारकांचा उद्देश होता.

रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, चंद्रशेखर आझाद, राजेंद्र लाहिडी, ठगडीलाल, मुरारीलाल, सचिंद्रनाथ बक्शीयांच्यासह १० ते १२ जण यात सहभागी होते. या घटनेमुळे क्रांतिकारक चळवळीला मोठे बळ मिळाले. लोकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्धचा रोष वाढला.

हे ही वाचा : 

संरक्षण क्षेत्रात भारताची भरारी – पाच वर्षांत उत्पादनात ९०% वाढ

रविचंद्रन अश्विन सीएसकेची साथ सोडण्याची शक्यता

भारतात लाँच झालेल्या इन्फिनिक्स जीटी ३० ५जी प्लस स्मार्टफोनचे फीचर्स बद्दल जाणून घ्या

स्टेट बँकेला पहिल्या तिमाहीत १९,१६० कोटी रुपये निव्वळ नफा

दरम्यान, या घटनेमुळे संतापलेल्या ब्रिटिश सरकारने याची गंभीर दखल घेत मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली. अनेक क्रांतिकारकांना अटक केली. रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिडी आणि ठाकुर रोशन सिंह यांना फाशीची शिक्षा झाली. तर बाकी काहींना जन्मठेप वा दीर्घकालीन कारावास मिळाला. यामध्ये चंद्रशेखर आझाद मात्र अटक होण्यापासून बचावले. परंतु नंतर १९३१ मध्ये झाशी येथे त्यांनी स्वतःवर गोळी झाडून वीरमरण पत्करलं.  दरम्यान, काकोरी ट्रेन अ‍ॅक्शन म्हणजे केवळ एक लूट नव्हती, तर ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतीय तरुणांची क्रांतीची ती ठिणगी होती.

Exit mobile version