30 C
Mumbai
Sunday, January 4, 2026
घरविशेषएअर इंडिया क्रॅश साइटवर सापडलेले पैसे आणि दागिने माणसाने केले परत!

एअर इंडिया क्रॅश साइटवर सापडलेले पैसे आणि दागिने माणसाने केले परत!

वस्तू पिडीत कुटुंबाना देणार असल्याची गृहमंत्री हर्ष संघवी यांची माहिती 

Google News Follow

Related

गेल्या आठवड्यात अहमदाबादमधील एका निवासी परिसरात एअर इंडियाचे विमान कोसळल्याची बातमी कळताच , ५६ वर्षीय राजू पटेल यांनी बचाव कार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. १५ मिनिटांतच, राजू १२ जून रोजी बीजे मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले आणि पीडितांना बाहेर काढण्यात मदत करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी ढिगाऱ्यातून दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आणि नंतर ती पोलिसांच्या स्वाधीन केली.

एअर इंडियाच्या विमान अपघातात एकूण २७४ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या दुर्घटनेतून एका प्रवासी सुखरूप बचावला. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, या सर्व गोंधळा दरम्यान आणखी एका व्यक्तीची चर्चा होत आहे, ज्यांचे नाव राजू पटेल आहे. घटनास्थळी पहिल्या मदतीसाठी पोहोचलेल्या व्यक्तींपैकी ते एक आहेत.

जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी फक्त गोंधळ, धुराचे लोट, उठणाऱ्या ज्वाला, किंचाळण्याचा या सर्व गोष्टी पाहिल्या. जास्त वेळ न घालवता, त्यांनी आणि इतरांनी स्थानिकांनी दिलेल्या कपड्यांचा आणि चटईंचा वापर करून जखमींना रुग्णवाहिकांपर्यंत पोहोचवले.

हे ही वाचा : 

‘मुंबई पब्लिक स्कूल’ काढणारे आज मराठीसाठी संघर्ष करताहेत!

आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण अटकेत

भारताचे कच्च्या तेलाचे पुरवठादार वाढून ४० वर

काँग्रेसने देशातील जनतेची माफी मागावी

“मी १५ मिनिटांत अपघातस्थळी पोहोचलो तेव्हा मला फक्त काळा धूर दिसत होता. काही वेळाने, अग्निशमन दलाने आग अंशतः आटोक्यात आणली तेव्हा आम्ही बचाव कार्य सुरू केले,” राजू यांनी आजतकला सांगितले. स्थानिकांनी दिलेल्या कपड्यांच्या आणि चटईंच्या मदतीने आम्ही मृतदेह रुग्णवाहिकांमध्ये नेले,” राजू म्हणाले.

बचाव अधिकारी पोहोचल्यावर, मी ढिगाऱ्यातून दागिने, रोख रक्कम आणि कागदपत्रे शोधण्याचे काम हाती घेतले. “सुमारे तीन तासांनंतर, अतुल्यम इमारतीजवळ जिथे इंजिन क्रॅश झाले होते, तिथे आम्ही लोखंडी सळ्या वापरून कचऱ्याचा ढिगारा बाजूला सारण्याचे काम केले, ज्यामध्ये काही बॅग सापडल्या, असे राजू म्हणाले. यावेळी त्यांनी रोख रक्कम, पासपोर्ट, मोबाईल फोन, लॅपटॉप, ओळखपत्रे आणि दागिने अशा अनेक वस्तू जप्त केल्या आणि त्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या.

“आम्हाला ६०,००० रुपये रोख, परकीय चलन, लॅपटॉप, मोबाईल फोन, ओळखपत्रे सापडली. सोनेही सापडले ज्यात हार, बांगड्या, मंगळसूत्र, अंगठ्या आणि चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. हे सर्व जप्त केले. रात्री ९ वाजेपर्यंत शोध मोहीम सुरु होती आणि सर्व सामान पोलिसांकडे सुपूर्द केले. दरम्यान, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, मिळालेल्या प्रत्येक वस्तूचे दस्तऐवजीकरण केले जात आहे आणि ते पीडितांच्या कुटुंबियांना परत केले जाईल.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा