‘आकाशतीर’ने कसा घेतला पाकिस्तानी ड्रोन्सचा अचूक वेध

भारतीय सशस्त्र दलांना प्राप्त झाली अधिक क्षमता

‘आकाशतीर’ने कसा घेतला पाकिस्तानी ड्रोन्सचा अचूक वेध

८ व ९ मे २०२५ च्या मध्यरात्री, पाकिस्तान सैन्याने भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळांवर झालेल्या हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी ड्रोन आणि इतर शस्त्रास्त्रांचा वापर करून पश्चिम सीमेवर अनेक आक्रमणे केली. भारतीय हल्ल्यांचे लक्ष्य पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ होते. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रणरेषेवर शस्त्रसंधी उल्लंघन करत नागरी भागांवर हल्ला चढवला. पण भारताने हे हल्ले परतवून लावले किंवा निष्फळ ठरविले.

भारतीय सशस्त्र दलांनी या पाकिस्तानी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि देशी बनावटीच्या ‘आयरन डोम’ अर्थात आकशतीर एअर डिफेन्स सिस्टिम (ADS) आणि S-400 ‘सुदर्शन चक्र’ एअर डिफेन्स सिस्टिमची तैनाती करून पाकिस्तानचे भारतीय नागरी भागांवर हल्ल्याचे कट कारस्थाने उधळून लावले.

पाकिस्तानी सैन्याने सुमारे १५ ठिकाणी समन्वयित ड्रोन हल्ले केले. यात श्रीनगर, जम्मू, अमृतसर, बठिंडा व चंदीगड यांचा समावेश होता. हे सर्व भाग संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचे आहेत कारण ते महत्वाच्या संरक्षण पायाभूत सुविधांच्या जवळ आहेत. मात्र, भारताने तात्काळ आपले बहुपर्यायी हवाई संरक्षण जाळे सक्रिय केले, ज्यात आकशतीरने निर्णायक भूमिका बजावली.

आकशतीरने पाकिस्तानचे डावपेच केले उद्ध्वस्त 

पाकिस्तानी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात, भारतीय सशस्त्र दलांनी स्वदेशी विकसित आकशतीर एअर डिफेन्स सिस्टिम सक्रिय केली. तिने पाकिस्तानकडून प्रक्षिप्त केलेल्या सर्व क्षेपणास्त्रे व ड्रोन अचूकपणे रोखले व नष्ट केले. आकशतीर ही ‘कमांड अँड कंट्रोल’ एअर डिफेन्स प्रणाली आहे, जी पश्चिम सीमेवर आंतरराष्ट्रीय सीमा (IB) व नियंत्रणरेषेवर (LoC) तैनात करण्यात आली आहे. ही प्रणाली रडार स्रोतांकडून (उदाहरणार्थ, अर्ली वॉर्निंग सिस्टिम व जमिनीवरील रडार) आलेली माहिती एकत्रित करून प्रत्यक्ष वेळी (real-time) हवाई धोक्यांचा अचूक मागोवा घेते. आकशतीरच्या मदतीने भारतीय सैन्याने पाकिस्तानकडून प्रक्षिप्त करण्यात आलेल्या प्रत्येक क्षेपणास्त्राचा अचूकपणे नायनाट केला.

२०२४ पासून भारतीय लष्करात टप्प्याटप्प्याने समाविष्ट होत असलेली आकशतीर प्रणाली हे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने विकसित केलेले एक प्रगत एअर डिफेन्स कंट्रोल अँड रिपोर्टिंग सिस्टिम आहे. आघाडीवरील लढाऊ क्षेत्रात ही प्रणाली जमिनीवरील हवाई संरक्षण शस्त्रास्त्रांचे व्यवस्थापन व कमी उंचीवरील हवाई क्षेत्राचे निरीक्षण करण्यासाठी वापरली जाते. ही प्रणाली भारतीय हवाई संरक्षण जाळ्याचे डिजिटल तंत्रिका केंद्र आहे.

आकशतीर विविध रडार्स व सेन्सर्स (AWACS व AEW&C प्लॅटफॉर्मसह) कडून मिळालेली माहिती एकत्र करून एक ऑपरेशनल चित्र सादर करते, जे आपोआप व रिअल-टाइम निर्णय घेण्यास मदत करते.

हे ही वाचा:

“भित्रे शाहबाज शरीफ पंतप्रधान मोदींचे नाव घ्यायला घाबरतात…” पाक खासदाराने सरकारला पाडले उघडे

पीएसएल एक्स चे सामने युएईत हलवले

वादग्रस्त विधानानंतर सोनू निगमचे गाणे कन्नड चित्रपटातून काढले

पाकिस्तानी चौकी उडवली; भारतीय सैन्याने शेअर केला प्रतिहल्ल्याचा व्हिडीओ

प्रणालीची वैशिष्ट्ये

संवादक्षमता, अद्ययावतता व भविष्यातील तयारी

आकशतीरमध्ये मजबूत संवादक यंत्रणा (communication redundancy) आहे, त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही संपर्क अबाधित राहतो. याशिवाय सॉफ्टवेअर व हार्डवेअर अपग्रेडची सुविधा आहे, त्यामुळे भविष्यातील बदलांसाठी प्रणाली सज्ज आहे.

परियोजना स्थिती:

आकशतीरच्या कार्यक्षमतेने व परिस्थितीचे अचूक भान ठेवण्याच्या क्षमतेने भारतीय संरक्षण उत्पादन व तंत्रज्ञानाची प्रगती अधोरेखित केली आहे. यामुळे भारतीय सशस्त्र दलांना आधुनिक हवाई आव्हानांचा अधिक प्रभावीपणे सामना करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.

Exit mobile version