आघाडीच्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनच्या किमतीत सोमवारी २.७५ टक्क्यांची वाढ झाली असून ती १,२१,०९७.९४ डॉलर्सवर पोहोचली आहे. ही पहिलीच वेळ आहे की जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीची किंमत १,२१,००० डॉलर्सच्या वर गेली आहे. CoinMarketCap च्या डेटानुसार, या वाढीमुळे बिटकॉइनचे एकूण मार्केट कॅप २.४१ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. आतापर्यंतच्या व्यवहारांमध्ये ट्रेडिंग व्हॉल्युम ६० अब्ज डॉलर्सहून अधिक नोंदवले गेले आहे. अहवालांनुसार, या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत बिटकॉइनच्या किमतीत २९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
यासोबतच, इतर क्रिप्टोकरन्सींच्या किमतींमध्येही वाढ पाहायला मिळत आहे. CoinMarketCap च्या माहितीनुसार, जगातील दुसऱ्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी इथेरियमची किंमत ३.२८ टक्क्यांनी वाढून ३,०५४.९६ डॉलर्स झाली आहे आणि त्याचे मार्केट कॅप ३६८.७७ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. याच दरम्यान इथेरियमचे ट्रेड व्हॉल्युम २१.६२ अब्ज डॉलर्स होते. बाजार विश्लेषकांचे मत आहे की, संस्थात्मक खरेदीदारांमुळे बिटकॉइनची किंमत येत्या एक-दोन महिन्यांत १,२५,००० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.
हेही वाचा..
शुभांशू शुक्ला २१ तास प्रवास करून पृथ्वीवर अवतरणार!
नूहमध्ये जलाभिषेक यात्रेसाठी कडेकोट बंदोबस्त!
देशातील ८ कंपन्यांचे मार्केट कॅप २.०७ लाख कोटींनी घसरले, टीसीएसला सर्वाधिक नुकसान
CIFDAQ चे संस्थापक आणि अध्यक्ष हिमांशु मराडिया यांनी सांगितले की, “बिटकॉइनच्या किमतीत होणाऱ्या वाढीचा मुख्य चालक म्हणजे संस्थात्मक मागणी आहे. अमेरिकन बिटकॉइन ETF मध्ये आतापर्यंत ५० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक निव्वळ गुंतवणूक झाली आहे. फक्त ब्लॅकरॉककडेच सध्या ६५ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक बिटकॉइन आहे, आणि कॉर्पोरेट ट्रेझरीमध्येही सातत्याने वाढ होत आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे क्रिप्टो-समर्थक धोरण, बिटकॉइनच्या राखीव साठ्यावर दिला जाणारा भर आणि ETF मंजुरीच्या निकषांमध्ये झालेले सुलभीकरण या गोष्टींमुळेही बाजारात आशावाद वाढला आहे.
मराडिया पुढे म्हणाले, “कमजोर होत चाललेला डॉलर, वाढती ट्रेझरी मागणी आणि सार्वभौम पतन दर्जा (sovereign credit downgrade) अशा मोठ्या आर्थिक घडामोडी बिटकॉइनला एक ‘हेज’ किंवा संरक्षणात्मक गुंतवणूक म्हणून अधिक बळकट करत आहेत. नियामक स्पष्टता सुधारली आहे आणि कॉइनबेसला S&P ५०० मध्ये समाविष्ट केल्यामुळे बिटकॉइनला मुख्य प्रवाहातील मालमत्तेचे स्वरूप मिळाले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, ही किंमतवाढ फक्त किरकोळ गुंतवणूकदारांमुळे घडलेली नाही. यामागे आहे विविध गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये व्हर्चुअल डिजिटल मालमत्तेची वाढती भूमिका आणि बिटकॉइनच्या स्वीकारलेपणात झालेली वाढ – हे या घडामोडींचे खरे संकेत आहेत.







