एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या अहमदाबादमधील अपघातातून वाचलेला एकमेव प्रवासी, विश्वास कुमार रमेश (ब्रिटिश नागरिक) यांनी या भीषण दुर्घटनेनंतर ते कशापद्धतीने चमत्कारिकरित्या बचावले याचे वर्णन केले आहे. या दुर्घटनेत २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे.
रमेश या विमानातील 11A या आसनावर बसले होते. हे आसन विमानाच्या डाव्या बाजूला आपत्कालीन दरवाजाजवळ होते. त्यांनी सांगितले की, टेकऑफनंतर काही वेळातच विमानाचे तुकडे झाले आणि त्यांची सीट उखडून विमानापासून दूर फेकली गेली. त्यामुळे ते जळत्या विमानाच्या आगीतून वाचू शकले.
त्यांनी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांना सांगितले, “विमान तुटलं आणि माझं आसन उडून फेकले गेले. त्यामुळेच मी वाचलो.”
रमेश म्हणाला की, तो विमानातून उडी मारून बाहेर पडला नाही, तर विमान तुटल्यानंतर आसनासकट बाहेर फेकला गेला. मी जिथे पडलो, त्यानंतर मी सीट बेल्ट काढला आणि एका क्षणी मला वाटलं की मी मेलोच. पण मी जमिनीपासून फार उंच नव्हतो, म्हणून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला,” असे त्यांनी दूरदर्शन (DD News) ला सांगितले.
विमानाचे दरवाजे तुटलेले दिसल्यामुळे रमेश स्वतः चालत बाहेर पडला. त्याच्या आजूबाजूला प्रवासी आणि क्रू सदस्य मृत्यूमुखी पडल्याचे दिसत होते. माझा जीव कसा वाचला, यावर माझाच विश्वास बसत नाही,” रमेश म्हणाले. “माझ्या डोळ्यांसमोर लोक मरत होते. मी स्वतः मरतो की काय, असं वाटलं होतं.
एका व्हायरल व्हिडिओमध्ये, जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेत रमेश एका अॅम्ब्युलन्सकडे लंगडत जाताना दिसतो आणि आजूबाजूचे लोक त्यांना विमानातील इतर प्रवाशांबाबत विचारत आहेत. सध्या रमेश ट्रॉमा वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली आहे.
हे ही वाचा:
भारताच्या फिजिक क्वीनची प्रेरणादायी कहाणी
टिकलं तर लाडकं नाहीतर कच्चं मडकं |
आधी धमकी दिली, मग साखरेसाठी वाडगा पुढे केला…
इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख ठार!
हे बोइंग 787-8 ड्रीमलाइनर लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी निघाले होते, पण अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच ते एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले. या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते.
११ वर्ष जुने हे विमान हवेत उड्डाण केल्यानंतर केवळ ६०० ते ८०० फूट उंच गेले आणि लगेचच कोसळले. विमान कोसळतानाच त्याने पेट घेतला आणि आकाशात काळ्या धुराचे लोट दिसू लागले.
अपघातानंतरच्या दृश्यांमध्ये BJ मेडिकल कॉलेजच्या इमारतीत विमानाचे अवशेष, लँडिंग गियर, फ्यूसेलाज आणि टेल दिसत होते. दुहेरी इंजिन असलेल्या या विमानाने टेकऑफनंतर १.३९ वाजता ‘मे डे’ आपत्कालीन संदेश दिला होता, असे एअर ट्रॅफिक कंट्रोलने सांगितले.
या अपघाताची अधिकृत चौकशी सुरु असून, फ्लाइट डाटा रेकॉर्डर आणि कॉपिट व्हॉईस रेकॉर्डर (ब्लॅक बॉक्स) शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एअर इंडियाच्या माहितीनुसार, विमानातील प्रवाशांपैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिक होते. उर्वरित १२ जणांमध्ये दोन पायलट आणि १० क्रू सदस्य होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते विजय रुपाणी हेही या अपघातग्रस्त विमानात होते.







