जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या गुजरात भेटीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ओमर अब्दुल्ला यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ भेटीमुळे सर्व भारतीयांना देशाच्या विविध भागात प्रवास करण्याची प्रेरणा मिळेल असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. दरम्यान, पर्यटनाशी संबंधित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला अहमदाबादला आले होते.
पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिले, “काश्मीर ते केवडिया. ओमर अब्दुल्ला जी साबरमती रिव्हरफ्रंटवर धावण्याचा आनंद घेत आहेत आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देत आहेत हे पाहून आनंद झाला. एसओयूला [स्टॅच्यू ऑफ युनिटी] त्यांची भेट एकतेचा महत्त्वाचा संदेश देते आणि आपल्या भारतीयांना भारताच्या विविध भागात प्रवास करण्यास प्रेरित करेल.”
पर्यटनाशी संबंधित कार्यक्रमासाठी अहमदाबादला आलेले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एकस्वर आपला अनुभव शेअर करताना लिहिले: “#Ahmedabad मध्ये एका पर्यटन कार्यक्रमासाठी असताना मी प्रसिद्ध साबरमती रिव्हर फ्रंट प्रोमेनेडवर माझी सकाळची धाव घेण्यासाठी येथे आलो होतो. हे मी धावू शकलेल्या सर्वात छान ठिकाणांपैकी एक आहे आणि ते इतर अनेक वॉकर्स/धावपटूंसोबत शेअर करायला मिळणे हा आनंददायी अनुभव होता. मी अगदी अद्भुत अटल फूट ब्रिजवरून धावण्यातही यशस्वी झालो.”







