महायुतीचा शपथविधी ५ डिसेंबरला होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही हवेत उडणारे बातम्यांचे पतंग थांबलेले नाहीत. आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. त्यावरून विरोधी पक्षही आपापली मते व्यक्त करत आहे. या बातमीवरून स्वतः श्रीकांत शिंदे यांनी एक्सवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिले आहे.
श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे की, महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत.
हे ही वाचा:
जामीन मंजूर होताच दुसऱ्याचं दिवशी मंत्री, हे सगळं काय चाललंय? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
युपीच्या शेतकऱ्यांच्या संसदेकडे मोर्चा
योगी सरकारचा मोठा निर्णय; महाकुंभ मेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा
बांगलादेशने इस्कॉनच्या ५० हून अधिक सदस्यांना भारतात येण्याची परवानगी नाकारली
ते म्हणतात, वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे. माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा…







