मी परत येईन म्हणून जिवंत…

शेख हसीना यांचा युनुस सरकारवर हल्लाबोल 

मी परत येईन म्हणून जिवंत…

बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर हल्लाबोल केला. हसीना शेख म्हणाल्या, ‘मी बांगलादेशात प्रत्येक पीडितेच्या कुटुंबाला मदत करेन आणि त्यांच्या मारेकऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणेन. मी परत येईन, कदाचित म्हणूनच मी जिवंत आह, असे हसीना शेख यांनी म्हटले.

अवामी लीग कार्यकर्त्यांना ऑनलाइन संबोधित करताना हसीना शेख म्हणाल्या, ‘युनुस यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही. त्यांनी सर्व तपास समित्या बरखास्त केल्या आणि लोकांना मारण्यासाठी दहशतवाद्यांना मोकळे सोडले. ते बांगलादेशचा नाश करत आहेत. आम्ही दहशतवाद्यांचे हे सरकार उलथवून टाकू, असे हसीना शेख म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, ‘मी प्रत्येक पीडितेच्या कुटुंबाला मदत करेन आणि त्यांच्या मारेकऱ्यांना बांगलादेशात कायद्याच्या कचाट्यात आणेन. मी परत येईन, म्हणूनच जिवंत आहे. जुलै-ऑगस्टमधील विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांचा मृत्यू पोलिसांच्या गोळीबारात झाला नाही, असा दावा ही त्यांनी केला. जर आता शवविच्छेदन झाले तर माझा दावा खरा ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा : 

दरोड्याचा बनाव रचणाऱ्या ‘आप’ नेत्यानेचं पत्नीच्या हत्येसाठी पाठवले होते हल्लेखोर

३० वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी जोडप्यासह त्यांच्या मुलाला अटक

नोकरीची संधी देत टेस्लाकडून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना

कॅनडातील टोरंटो विमानतळावर विमान उलटले; १८ प्रवासी जखमी

निदर्शनांदरम्यान पोलिसांच्या कारवाईचे हसीना शेख यांनी समर्थन केले आणि अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संयम दाखवल्याचे म्हटले. त्या म्हणाल्या, पोलिसांनी फक्त हल्ला झाला तेव्हाच कारवाई केली. अबू सईद प्रकरणात पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतरच कारवाई केली. माझ्या मते पोलिसांनी जास्तीत जास्त संयम बाळगला. सुनियोजित कटाचा भाग म्हणून पोलिसांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

शेख हसीना यांनी युनूस सरकारवर हिंसाचार करणाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला आणि म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या हिंसाचारामुळे पोलिस, अवामी लीगचे कार्यकर्ते, बुद्धिजीवी आणि कलाकार मारले गेले. तरीही ते कायद्याला सामोरे जाणार नाहीत. युनूसच्या राजवटीत मृतांचे कुटुंब न्याय मागू शकत नाहीत, असे शेख म्हणाल्या.

हसीना यांनी मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना राज्य करण्यास अयोग्य असल्याचे म्हटले. “युनूस यांनी स्वतः कबूल केले की ते देश चालवण्यास असमर्थ आहेत, तरीही ते याच मार्गावर चालत आहेत. सरकारी प्रतिष्ठानांवर आणि अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांमुळे त्यांची अकार्यक्षमता दिसून येते,” असे त्या म्हणाल्या.

Exit mobile version