भारतीय लष्कराने रविवारी (११ मे) पुष्टी केली की १९९९ च्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे (IC-८१४) अपहरण आणि २०१९ च्या पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेले अनेक उच्च दर्जाचे पाकिस्तानी दहशतवादी ठार झालेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. आज (११ मे) तीनही दलाच्या डीजीएमओ यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत आतापर्यंत पाकिस्त्नान विरुद्ध केलेल्या कारवाईची अधिकाऱ्यांनी माहिती दिली. लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, हवाई दलाचे डीजीएमओ एअर मार्शल अवधेश कुमार भारती आणि भारतीय नौदलाचे व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
“त्या नऊ दहशतवादी केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले, ज्यात युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद सारखे उच्च दर्जाचे दहशतवादी मारले गेले, जे ‘IC-८१४’ च्या अपहरणात आणि पुलवामा बॉम्बस्फोटात सहभागी होते,” असे एअर मार्शल एके भारती यांनी लष्कराच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
जैश-ए-मोहम्मद (जेईएम) चा प्रमुख मौलाना मसूद अझहरचा भाऊ युसूफ अझहर हा आयसी-८१४ अपहरण प्रकरणात हवा होता, ज्यामुळे १९९९ मध्ये मसूद अझहरची सुटका झाली. त्याने दहशतवादी गटाच्या कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, शस्त्रास्त्र प्रशिक्षणावर देखरेख केली आणि जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
भारताविरुद्ध पाकला ड्रोन पुरविणाऱ्या तुर्कीचे सफरचंद आम्हाला नको!
पंतप्रधान मोदींनी ठणकावले; आता पाकिस्तानशी चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच!
मला अभिमान आहे, वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन!
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा!
“दहशतवादाचे गुन्हेगार आणि योजना आखणाऱ्यांना शिक्षा करणे आणि त्यांच्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे, हे लष्कराचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यानुसार ‘ऑपरेशन सिंदूर’ची संकल्पना मांडण्यात आली होती, असे उच्च लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.







