बोली का जवाब बोली, गोली का जवाब गोला, प्रधानमंत्र्यांचा हा ‘नवा भारत’

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचे ट्वीट

बोली का जवाब बोली, गोली का जवाब गोला, प्रधानमंत्र्यांचा हा ‘नवा भारत’

भारत-पाकिस्तान युद्धबंदी झाल्यानंतर दोनही बाजूने सध्या शांततेचे वातावरण आहे. मागील अनेक दिवसानंतर एलओसीवर काल (११ मे) गोळीबाराची घटना घडली नाही. युद्धबंदी झाली असली तरी दहशतवाद विरोधी कारवाई सुरूच राहणार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच भारतावर कोणताही हल्ला झाला तर जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही भारताने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट म्हटले की, वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या भूमिकेवर भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट केले आणि प्रधानमंत्र्यांचा नेतृत्वाखालील हा ‘नवा भारत’ असल्याचे म्हटले.

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तान केलेली कारवाई संपूर्ण जगाने पाहिली. भारताच्या शांततेचे रूप सर्वांनी पाहिले होते आता दुसरे रूप देखील सर्वांनी पाहिले. भारत-पाक तणावा दरम्यान चीन आणि तुर्कीची बरीच चर्चा झाली. कारण युद्धासाठी चीनने पाकला दिलेली क्षेपणास्त्र आणि तुर्कीचे ड्रोन भारतासमोर टिकले नाहीत. भारताच्या कारवाईत ती नष्ट झाली. त्यामुळे याची सर्वत्र चर्चा झाली. पाकिस्तानने अनेक हल्ले करून भारताचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते यशस्वी होवू शकले नाहीत.

हे ही वाचा : 

“भारत- पाक युद्धबंदीमध्ये अमेरिकेची भूमिका ही मध्यस्थाची नव्हे तर रचनात्मक”

सेनादलांचे स्पष्ट संकेत, दु:साहस केलेत तर तांडव होणार…

काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्याकडून ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह

पाकिस्तानी मिराजचे तुकडे, भारताने व्हिडीओ जारी करत केली पुष्टी!

दोनही देशात तणाव वाढत असताना यामध्ये अमेरिकेने उडी घेतली आणि शांतात राखण्याचे आवाहन केले. अखेर अमेरिकेने मध्यस्थी करत युद्धबंदी जाहीर केली. यावेळी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, जर पाकिस्तानने काहीही केले तर त्याचे उत्तर आणखी विनाशकारी आणि कठोर असेल. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा झाली. यावरून स्पष्ट होते कि, भारत कोणासमोर झुकणार नाही, जर कोणी हल्ला केला तर त्याला तसेच उत्तर दिले जाईल.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी स्वागत केले. एक्सवर ट्वीटकरत म्हणाले, ‘बोली का जवाब बोली, गोली का जवाब गोला’ हा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील “नया भारत”.

Exit mobile version