आपल्या देशात राजकारण्यांच्या निवृत्तीबद्दल नेहमीच चर्चा होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची निवृत्ती योजना उघड केली होती. निवृत्तीनंतर मी माझे उर्वरित आयुष्य वेद, उपनिषदे आणि नैसर्गिक शेतीसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे गृहमंत्री शाह म्हणाले होते. यानंतर आता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या निवृत्तीबद्दल मौन सोडले आहे. आज (१० जुलै) जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांचे वक्तव्य समोर आले आहे.
ते म्हणाले, “देवाची इच्छा असेल तर मी ऑगस्ट २०२७ मध्ये निवृत्त होईन.” जागतिक शक्ती म्हणून भारताच्या उदयाबरोबरच त्याची बौद्धिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठा देखील विकसित झाली पाहिजे. ते म्हणाले, राष्ट्राची ताकद त्याच्या विचारांच्या मौलिकतेमध्ये आणि त्याच्या मूल्यांच्या शाश्वततेमध्ये असते.
दरम्यान, १४ वे उपराष्ट्रपती म्हणून धनखर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ रोजी संपणार आहे. व्यवसायाने वकील असलेले धनखर हे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवडले तेव्हा पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.
हे ही वाचा :
कॅनडामध्ये विमानांची टक्कर, भारतीय विद्यार्थ्यासह दोघांचा मृत्यू!
एफटीएमुळे कृषी क्षेत्राला चालना
थरूर यांच्यावर काँग्रेसची टीका, भाजपाला साजेसे वक्तव्य केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरील याचिका : सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
उपराष्ट्रपती धनखड यांच्या आधी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल मोठे विधान केले होते. अमित शहा म्हणाले की त्यांनी राजकारणातून निवृत्तीची योजना आखली आहे. ते म्हणाले की, निवृत्तीनंतर मी माझे उर्वरित आयुष्य वेद, उपनिषदे आणि नैसर्गिक शेतीसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. मला शेती करायला आवडते, निवृत्तीनंतर मी नैसर्गिक शेती करेन. नैसर्गिक शेती यामध्ये खूप महत्त्वाची आहे, हा एक प्रकारचा वैज्ञानिक प्रयोग आहे जो अनेक फायदे देतो.







