‘ऑपरेशन सिंदूर’ला यशाच्या नव्या शिखरावर पोहोचवण्याचे कार्य भारतीय सैन्याच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शक्य झाले. एक-दोन नव्हे, तर पाकिस्तानच्या भूमीवरील तब्बल ११ एअरबेस केवळ ९० मिनिटांत उद्ध्वस्त करण्यात आले. हे सर्व अगदी सुनिश्चित आणि काटेकोरपणे आखलेल्या रणनीतीचा भाग होता. भारताची गर्जना संपूर्ण जगाने ऐकली. सहजता, बुद्धिमत्ता आणि चपळतेने भारतीय सैन्याने केलेल्या या कामगिरीला भाजपने सलाम केला आहे.
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले की, केवळ ९० मिनिटांत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हवाई दलाचे कंबरडे मोडले. एक्स पोस्टवर भारतीय सैन्याला सलाम करताना त्यांनी पद्धतशीर रीतीने एअरबेस नष्ट करण्याची कहाणी मांडली आहे.
पोस्टमध्ये लिहिले आहे की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकिस्तानच्या प्रमुख एअरबेसवर ९० मिनिटे हल्ले केले. या हल्ल्यांनी पाकिस्तानच्या हवाई वर्चस्वाच्या दाव्यांचा पुरता नायनाट केला. या अचूक हल्ल्यांनी पाकिस्तानची हवाई श्रेष्ठता टिकवून ठेवण्याची क्षमता, राष्ट्रीय सुरक्षेचे समन्वय आणि कोणतीही तातडीची प्रत्युत्तर देण्याची क्षमता उद्ध्वस्त केली. प्रत्येक बेसचे एक महत्त्वाचे कार्य होते आणि त्याच्या विनाशाने पाकिस्तानच्या लष्करी प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला.
हे ही वाचा:
“भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून मशिदींचे नुकसान केल्याचा पाकचा दावा खोटा!”
मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची घेतली माहिती
पाकिस्तानी ड्रोनचा टार्गेट होते निष्पाप नागरिक
पाकिस्तानच्या ज्या एअरबेसना तडाखा बसला ते असे-
नूर खान/चकलाला एअरबेस (रावळपिंडी) — या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या हवाई रसद आणि उच्चस्तरीय सैन्य समन्वयाचे केंद्र बाधित झाले. हा इस्लामाबादजवळचा प्रमुख बेस आहे. महत्त्वाच्या व्यक्तींच्या हालचाली आणि लष्करी रसदीसाठी हा बेस वापरला जातो. त्यामुळे संघर्षाच्या काळात पीएएफ आणि त्याच्या ऑपरेशनल युनिट्समधील महत्त्वाचे संबंध तुटले.
पीएएफ बेस रफीकी (शोरकोट) — हा पाकिस्तानच्या फ्रंटलाइन फायटर स्क्वॉड्रन्सचा प्रमुख बेस होता. भारताने ते निष्क्रिय करून, त्यांच्या हवाई प्रत्युत्तर क्षमतेला गंभीर फटका दिला.
मुरीद एअरबेस (पंजाब) — हे प्रशिक्षण व संभाव्य क्षेपणास्त्र संचयन केंद्र भारताने लक्ष्य केले. यामुळे पाकिस्तानच्या पायलट प्रशिक्षणाची पाइपलाइनच तोडण्यात आली.
सुक्कुर एअरबेस (सिंध) —हा बेस नष्ट झाल्यामुळे पाकिस्तानच्या दक्षिणेकडील हवाई कॉरिडॉरला फटका बसला आणि दक्षिण पाकिस्तानमध्ये लष्करी हालचाली खुंटल्या.
सियालकोट एअरबेस (पूर्व पंजाब) — हा बेस भारताच्या सीमेपासून जवळ असल्याने सुरुवातीलाच निष्क्रिय करण्यात आले.
पसरूर एअरस्ट्रिप (पंजाब) — हे लहान असले तरी आपत्कालीन उड्डाणांसाठी महत्त्वाचे होते. याचे नष्ट होणे पाकिस्तानसाठी सामरिकदृष्ट्या धोकादायक ठरले.
चुनियन (रडार/सहाय्य केंद्र) — इथल्या रडार कव्हरेज आणि संवाद व्यवस्था नष्ट केल्यामुळे भारताला हवाई प्रवेश सुलभ झाला.
सरगोधा एअरबेस (मुशफ बेस) — हा पाकिस्तानमधील सर्वात महत्त्वाचा बेस मानला जातो. कॉम्बॅट कमांडर्स स्कूल, अण्वस्त्र वितरण आणि एलिट स्क्वॉड्रन्सचे हे मुख्यालय होते.हा बेस नष्ट झाल्यामुळे पाकिस्तानच्या कमांड अँड कंट्रोल प्रणालीला पंगुत्व आले आहे.
स्कार्दू एअरबेस (गिलगिट-बाल्टिस्तान) — याच्या निष्क्रियतेमुळे एलओसीजवळ पाकिस्तानची उत्तरेकडील हवाई नजर व हवाई ऑपरेशन कमकुवत झाले.
भोलारी एअरबेस (कराचीजवळ) — हे नवीनतम द्वैत वापराचे एअरबेस होते (नौसेना व हवाई), जे दक्षिणेकडील बल प्रक्षेपणासाठी होते. याच्या नष्टतेमुळे कराची असुरक्षित झाले.
जैकबाबाद एअरबेस (सिंध-बलुचिस्तान) — हे पश्चिम पाकिस्तानमधील लष्करी हालचालींसाठी महत्त्वाचे होते. हे नष्ट झाल्यामुळे पश्चिमेकडील पाकिस्तानची अंतर्गत गतिशीलता व हवाई देखरेख ठप्प झाली.
अमित मालवीय यांच्या पोस्टच्या शेवटी या एअरबेस नष्ट करण्यामुळे भारताला झालेल्या फायद्यांचा उल्लेख आहे. स्पष्ट करण्यात आले आहे की, भारताच्या झपाट्याने आणि समन्वयित हल्ल्यांनी पाकिस्तानच्या हवाई क्षमतेला रणनीतिकदृष्ट्या नष्ट केले. रडार नेटवर्क, कमांड हब आणि स्ट्राइक प्लॅटफॉर्म नष्ट केल्यामुळे पीएएफ अंधळे झाले आणि जमीनिवर गोंधळले. केवळ रणांगणावरची विजय नव्हे तर हा संरचनात्मक विध्वंस होता — ज्याचा उद्देश पाकिस्तानच्या लढण्याच्या क्षमतेला कायमचे पंगू करणे आणि भविष्यात आक्रमण करण्याची कल्पनाही न करण्यास भाग पाडणे होता.
या ऑपरेशनने केवळ भारताची तांत्रिक व सामरिक श्रेष्ठता दर्शवली नाही तर दक्षिण आशियातील लष्करी व्यवहाराचे नियम पुन्हा लिहिले. पाकिस्तानच्या एअरबेस नष्ट केल्याने स्पष्ट संदेश गेला — आता भारत मागे हटणार नाही आणि उकसाव्याची किंमत विध्वंसक असेल.
