“भाई, टी२० म्हटलं की धडधड वाढते…
पण ऑस्ट्रेलियाला पाहिलं की भारताचं हृदय स्थिर होतं! कारण या फॉरमॅटचा खरा राजा कोण — हे आकडे सांगतात!”
नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर —
२९ ऑक्टोबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया पुन्हा भिडणार.
म्हटलं की काय, हाच तो क्लासिक कॉम्बो –
एक बाजूला वाळवंटातून आलेले ‘कंगारू’ आणि दुसऱ्या बाजूला ‘ब्लू आर्मी’चं समुद्रासारखं प्रचंड वर्चस्व!
२००७ पासून आजवर हे दोघे ३२ वेळा टी२० रंगमंचावर आमने-सामने आले.
आणि काय झालं?
भारताने २० विजयांचे फटके लगावले,
तर ऑस्ट्रेलिया फक्त ११ वेळा जिंकला.
एक सामना ‘काय होईल काय होईल’ असं म्हणत बेनतीजा निघून गेला!
पहिला सामना आठवतो का?
डरबन, २००७.
धोनीच्या केसात वारा, युवराजच्या बॅटमध्ये ज्वाला —
आणि समोर हताश पिवळे कपडे!
भारताने १५ धावांनी ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि जगाला सांगितलं —
“हा आहे नवा भारत!”
यानंतर ऑस्ट्रेलियाने २०१०-१२ दरम्यान थोडीशी हिम्मत दाखवली,
ती पण तीन सामन्यांपुरतीच.
मग २०१३ ते २०१७ –
भारताने सलग सात विजय मारले!
कंगारूंची उडी बंद, मैदानावर फक्त भारताचं वर्चस्व!
२०१८ मध्ये सीरीज ड्रॉ झाली,
पण २०२२ आणि २०२३ मध्ये पुन्हा भारताची ‘विजय-घंटा’ वाजली!
२०२३ मध्ये पाचपैकी चार सामने भारताने जिंकले.
आणि मग २०२४ च्या विश्वचषकात पुन्हा एकदा
‘मेन इन ब्लू’ ने २४ धावांनी ऑस्ट्रेलियाला खडे बोल सुनावले!
टी२० रेकॉर्डचा थाट:भारत – २० विजय
ऑस्ट्रेलिया – ११ विजय
बेनतीजा – १ सामना
“आता २९ ऑक्टोबरपासून पुन्हा रणधुमाळी सुरू होणार…
रनवृष्टी, चौकारांचा पाऊस आणि विकेट्सचा वादळ —
कंगारूंच्या मैदानावर पुन्हा भारताची गर्जना ऐकू येईल का?
की या वेळी वाळवंटात वीज चमकणार?”







